ढाल तलवार, रेल्वे इंजिन ते धनुष्यबाण; कसा आहे शिवसेनेच्या निवडणुक चिन्हाचा इतिहास

279 0

मुंबई: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमका कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती मात्र आज अखेर शनिवारी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं गेलं आहे.

 

19 जून 1966 रोजी शिवसेना पक्षाची स्थापना झाली. मराठी लोकांनी या ‘संघटना’ म्हणून उदयाला आलेल्या संस्थेचं सदस्यत्व मिळावं यासाठी धडपड सुरू केली. सुरुवातीच्या काळात राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देण्याची घोषणा करण्यात आली.

30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला. शिवाजी पार्कवर झालेल्या या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला. प्रबोधनकार ठाकरे यांनी ‘हा बाळ मी आज तुम्हाला दिला’ असे उद्गार काढले. त्यानंतर 1968 मध्ये राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेने नोंदणी केल्यानंतर ताडाच झाड ढाल तलवार ते रेल्वे इंजिन आणि धनुष्यबाण नेमका कसा राहिलाय शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा इतिहास तेच आपण जाणून घेऊयात…

शिवसेनेची स्थापना मुंबईतील मराठी माणसांच्या मुद्द्यांवर १९ जून १९६६ रोजी झाली. त्यावेळी एक संघटना असणाऱ्या शिवसेनेनं अनेक आंदोलने केली आणि त्यातूनच शिवसेनेची ओळख झाली. याच शिवसेनेची ओळख बनलेलं धनुष्यबाण हे चिन्ह पक्षाने मागणी न करता मिळालं होतं. निवडणूक आयोगाने शिवसेनेला ते दिलं होतं. त्याआधी पक्षाने ढाल-तलवार, इंजिन या चिन्हावर दोन दशके निवडणूक लढली.

निवडणूक आयोगाने १९८८ मध्ये सर्व राजकीय पक्षांच्या अधिकृत नोंदणीला सुरुवात केली. तेव्हा पक्षाकडे नोंदणी आणि पक्षचिन्हासाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते. तेव्हा शिवसेने संघटनेची नोंदणी करत असताना घटनासुद्धा दिली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेला पक्ष म्हणून मान्यता दिली. १९८९ मध्ये शिवसेना अधिकृत राजकीय पक्ष म्हणून अस्तित्वात आला. पण पक्षाला चिन्ह मात्र मिळालं नव्हतं. त्यासाठी पक्षाला त्यांना निवडणुकीत आवश्यक तेवढी मते मिळवता आली नव्हती.

पुढे काही महिन्यांनी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेनं भाजपसोबत युती केली. त्यात शिवसेनेला लोकसभेच्या चार जागी विजय मिळाला होता. तेव्हा शिवसेनेन पक्षाला चिन्ह मिळावं म्हणून अर्ज केला. शिवसेनेकडून खास अशा चिन्हाची मागणी करण्यात आली नव्हती. तेव्हा निवडणूक आयोगानेच त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह दिलं होतं. हे चिन्ह बाळासाहेब ठाकरे यांनाही आवडलं आणि शिवसेनेचं अधिकृत चिन्ह बनलं. तेव्हापासून आजपर्यंत शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत आहे.

 

Share This News

Related Post

शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेसाठी संभाजी ब्रिगेडची रणनीती ; मराठा सेवा संघात मोठे बदल

Posted by - September 1, 2022 0
मुंबई : शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भाजप आणि शिंदे सरकार स्थापन झाले . आता 2024 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच…
GANAPATI

अंगारकी चतुर्थी : या दिवशी श्री गणेशाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी सायंकाळी करा हा उपाय ; वाचा महत्व , कथा

Posted by - September 13, 2022 0
अंगारकी चतुर्थी : मुद्गल पुराण तसेच गणेश पुराण या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार, अंगारक या भारद्वाज ऋषी पुत्राने कठोर तप करून…
Dhule News

Dhule News : काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याच्या सूतगिरणीवर आयकर विभागाकडून छापा

Posted by - October 1, 2023 0
धुळे : धुळ्यामधून (Dhule News) एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या सहकारी सूतगिरणीवर आयकर…
Navneet Kaur Rana

Navneet Kaur Rana : नवनीत राणांचं ठरलं ! लोकसभा निवडणूक ‘या’ पक्षाच्या चिन्हावर लढवणार

Posted by - March 1, 2024 0
अमरावती : अमरावतीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Kaur Rana) या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची…

मोठी बातमी! माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा अपघात

Posted by - January 11, 2023 0
अमरावती: शिंदे गटातील प्रहारचे आमदार आणि राज्याचे माजी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे.यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर इजा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *