Shashi Tharoor

Lok Sabha Elections : देशात इंडिया आघाडीची सत्ता आल्यास पंतप्रधान कोण होणार? शशी थरूर यांनी सुचवली ‘ही’ 2 नावे

978 0

नवी दिल्ली : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तयारीला आतापासूनच सुरुवात झाली आहे. देशभरातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपविरोधात एकवटले आहेत. त्यांनी आपल्या आघाडीला इंडिया असं नाव दिलं आहे. त्यामुळे यावेळी लोकसभा निवडणुकीत एनडीएविरोधात इंडिया आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. यादरम्यान आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. जर 2024 मध्ये इंडिया आघाडी सत्तेत आली तर पंतप्रधान कोण होणार यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

काय म्हणाले शशी थरूर?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. जर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सत्ता मिळाली तर काँग्रेस राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव पंतप्रधानपदासाठी पुढे करू शकते. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी भाजपाच्या नेतृत्वात निवडणूक लढवणाऱ्या एनडीएचा पराभव करेल असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Share This News

Related Post

Crime News

Crime News : ‘या’ भाजप आमदाराच्या पुतण्याची गोळ्या घालून हत्या

Posted by - March 6, 2024 0
पाटणा : बिहारच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये भाजप आमदाराच्या पुतण्याची भरदिवसा गोळी झाडून हत्या (Crime…

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा; सिसोदिया म्हणाले…..

Posted by - August 19, 2022 0
नवी दिल्ली: सीबीआयने राजधानी दिल्लीमध्ये मोठी कारवाई केली आहे. येथे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासहित 21 ठिकाणी छापेमारी केली…
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता; ‘या’ आमदाराचा खळबळजनक दावा

Posted by - October 11, 2023 0
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे आमदार…
Supreme Court

Electoral Bond : सरकारकडे पैसा कुठून येतो याची माहिती आता सर्वसामान्यांना मिळणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Posted by - February 15, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इलेक्टोरल बॉण्डवर (Electoral Bond) सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. CJI चंद्रचूड अध्यक्ष असलेल्या 5…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *