Sharad Pawar and narendra modi

Sharad Pawar : मोदींच्या ‘भटकती आत्मा’ टीकेला शरद पवारांनी दिले सडेतोड प्रत्युत्तर

217 0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक असलेल्या शरद पवारांनी (Sharad Pawar) नरेंद्र मोदींना ‘भटकती आत्मा’ वरून केलेल्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. सोमवारी अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वार्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळेस घेण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये शरद पवार बोलत होते. शरद पवारांनी यावेळेस कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणामध्ये अगदी पक्ष स्थापनेपासून ते रविवारी मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्यापर्यंतच्या अनेक मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळेस पवारांनी मोदींनी केलेल्या टीकेलाही उत्तर दिलं.

काय म्हणाले शरद पवार?
“आम्ही राजकीय पक्ष म्हणून एकमेकांवर टीका करतो. पण टीका करताना सुद्धा काही मर्यादा ठेवतो. काय बोलले मोदी.. माझ्या बाबतीत बोलले. माझ्या बाबतीत विधान काय तर हा भटकता आत्मा आहे. माझा त्यांनी असा उल्लेख केला की हा भटकता आत्मा आहे. एका दृष्टीनं बरं झालं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो. हा कायम राहाणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही. कारण तो कायम त्याठिकाणी राहणार आहे,” असं शरद पवार म्हणाले.

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?
पंतप्रधान मोदींनी 29 एप्रिल रोजी पुण्यात महायुतीच्या 4 उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली होती. या सभेतील भाषणामध्ये मोदींनी शरद पवारांचा ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख करत निशाणा साधलेला. “महाराष्ट्राने दिर्घकाळ राजकीय अस्थिरतेचा काळ पाहिला आहे. मी जे बोलतोय ते कोणी व्यक्तिगत घेऊ नका. आमच्याकडे म्हणतात, काही भटकत्या आत्मा असतात. ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, ज्यांची स्वप्नं पूर्ण होत नाहीत त्या आत्मा भटकत राहतात. स्वत:चं नाही झालं तर इतरांचं बिघडवण्यात त्यांना मजा येते. आपला महाराष्ट्रही अशा भटकत्या आत्म्यांना बळी पडला आहे. 45 वर्षांआधी येथील एका मोठ्या नेत्याने आपल्या महत्त्वकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली,” असं म्हणत मोदींनी थेट उल्लेख न करता शरद पवारांना टोला लगावला होता. “तेव्हापासून (मागील 45 वर्षांपासून) महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण सुरु आहे. अनेक मुख्यमंत्री आपला कार्यकाळ पूर्ण करु शकले नाहीत. ही आत्मा काहीही करते. विरोधकांनाही तिने अस्थिर केलं आहे. ही आत्मा आपल्या पक्षाला आणि कुटुंबालाही अस्थिर केलं आहे. 1995 महायुती सरकारवेळीही या आत्माने सरकारला अस्थिरत करण्याचा प्रयत्न केला,” असंही मोदींनी यावेळी म्हटलं होतं.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Viral Video : पेट्रल भरताना फोन वाजला अन् आगीचा भडका उडाला; CCTV फुटेज आलं समोर

IMD Monsoon Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट; हवामान खात्याने वर्तवला धडकी भरवणारा अंदाज

Manoj Jarange : उपोषणाचा चौथा दिवस ! जरांगे पाटलांची प्रकृती खालावली

Share This News

Related Post

महाविकास आघाडीच्या मोर्चामुळं वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Posted by - December 17, 2022 0
मुंबई: महापुरुषांबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचा महामोर्चा आज १७ डिसेंबरला मुंबईत काढण्यात येणार आहे. महामोर्चा कसा…
Pune Police

Pune Police : पुणे पोलिसांचा मोठा निर्णय ! सर्व राजकीय नेत्यांच्या…

Posted by - March 19, 2024 0
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिसांनी (Pune Police) जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यात कोणतंही गैरकृत्य होणार नाही…
chitra wagh

Loksabha : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीवर भाजपकडून आक्षेप

Posted by - May 2, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीची (Loksabha) रणधुमाळी सुरू झाली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीवर भाजपकडून आक्षेप…

राज्यातील 7 हजार ग्रामपंचायतींचा आज धुरळा; कोणत्या जिल्ह्यात आहे निवडणूक

Posted by - December 18, 2022 0
राज्याताील एकूण 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी हे मतदान पार पडणार आहे. सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीचा…

पंढरपूर:लाल मातीतील कुस्ती भारतीय संस्कृतीशी जुळलेली-पै.जगदीश कालीरमण

Posted by - July 9, 2022 0
पंढरपूर :“रामायण आणि महाभारतात मल्ल या शब्दाचा उल्लेख सापडतो. त्यामुळेच लाल मातीतील कुस्ती ही भारतीय संस्कृतीशी जुळलेली आहे. बल आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *