Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली ‘ही’ मोठी अपडेट

421 0

पुणे : शनिवारी शरद पवार (Sharad Pawar) यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली होती. विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीमध्येच पवार यांना त्रास जाणवू लागल्याने जागेवरच डॉक्टरांकडून पवारांची तपासणी करण्यात आली. दरम्यान आज पुन्हा एकदा शरद पवार यांची तपासणी करण्यासाठी डॉक्टर गोविंद बागेत पोहोचले. डॉक्टरांनी तब्बल अर्धा तास शरद पवार यांची तपासणी केली. यानंतर शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. पवार यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवार यांनी पुरंदर तालुक्यातील आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत.

दिवाळीनिमित्त संपूर्ण पवार कुटुंबीय बारामतीत आले आहे. शनिवारी सकाळी दहा वाजता एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या ठिकाणी पवार यांनी बैठकीला उपस्थिती लावली. त्यानंतर दुपारी चार वाजता विद्या प्रतिष्ठान या संस्थेच्या बैठकीकरीता शरद पवार विद्यानगरी येथे गेले असताना, त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले.यानंतर तात्काळ बैठकीच्या ठिकाणी हृदयरोग तज्ञ डॉक्टर रमेश भोईटे डॉक्टर सनी शिंदे यांना बोलावून तपासणी केली. यावेळी पवार यांचा एसीजी देखील काढण्यात आला. सततच्या कार्यक्रमामुळे आणि विश्रांती न घेतल्यामुळे पवार यांना थकवा आला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांकडून शरद पवार यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

AJIT PAWAR

राष्ट्रवादीच्या फक्त त्याच लोकांना विधानसभेचे तिकीट मिळणार; अजित पवारांचे मोठे वक्तव्य

Posted by - June 4, 2023 0
मुंबई : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा सोमवारी वाढदिवस आहे, या निमित्ताने नागपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार पोस्टरबाजी…
Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवारांना मोठा धक्का ! ‘या’ युवा नेत्याने घेतली प्रफुल्ल पटेल यांची भेट

Posted by - May 26, 2024 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची अनेक ज्येष्ठ नेत्यांनी साथ सोडली. यात राज्यातील…
Maharashtra Politics

Maharashtra Politics : धुळ्यात भाजपाच्या उमेदवाराचं लक्ष ‘MIM’ च्या उमेदवारीकडे

Posted by - April 8, 2024 0
धुळ्यात माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या गळ्यात तिसऱ्यांदा उमेदवारीची माळ टाकली आहे. या मतदारसंघात दोन लाखाहून अधिक मुस्लिम…
Vishal Patil

Sangli Loksabha : बंडखोर विशाल पाटलांवर अजून कारवाई का केली नाही? काँग्रेसने केला ‘हा’ खुलासा

Posted by - May 6, 2024 0
सांगली : लोकसभा निवडणुकीत (Sangli Loksabha) उमेदवारीवरून नाराज झालेल्या काँग्रेस नेत्याची मनधरणी करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले आहे. महाराष्ट्र प्रभारी रमेश…
Pune Video

Pune Video : पुण्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला; CCTV आले समोर

Posted by - December 25, 2023 0
पुणे : पुण्यातून (Pune Video) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका चिमुकल्यावर तीन भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *