Govardhan Sharma

Govardhan Sharma : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन

1569 0

अकोला : भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते आणि अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा (Govardhan Sharma) यांचे काल रात्री निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर काल त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

गोवर्धन शर्मा यांनी सहावेळा अकोला पश्चिम मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. राज्यमंत्री म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केलं. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला विस्तार करण्यात मोठी मदत झाली. अकोला जिल्ह्यात त्यांना लोकनेते म्हणून ओळखले जात होते. सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम भक्त पक्षाविषयी असलेले एकनिष्ठ लोकनेते म्हणून त्यांची ओळख होती.

तसेच पश्चिम विदर्भात भारतीय जनता पक्षाला वाढवणारे आणि लोकप्रतिनिधी घडवणारे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन, भाऊसाहेब फुंडकर, प्रमिलाताई टोपले, वसंतराव देशमुख, संजय भाऊ धोत्रे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने भारतीय जनता पक्षाची फार मोठी हानी झाली आहे. आज त्यांच्यावर अन्नपूर्णा माता मंदिराजवळ अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

Share This News

Related Post

” 30 लाख रुपये नही दिये तो, रेप केस मे अंदर कर दुंगी…!” मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी, वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - March 7, 2023 0
पुणे : पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खंडणीसाठी ही…
Manoj Jarange

विधानसभा लढवणारच! मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा; 127 विधानसभा जागांचा सर्व्हे पूर्ण

Posted by - June 19, 2024 0
राज्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र झालेले पाहायला मिळत आहे. राज्य सरकारकडून सगे सोयऱ्यांच्या मुद्द्यावर अजूनही सकारात्मक भूमिका आलेली नाही. तसा…
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : नकली शिवसेना म्हणता ती तुमची डिग्री आहे का? उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

Posted by - April 12, 2024 0
पालघर : आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पालघरमध्ये जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर…

#PUNE : राज्यसेवा परीक्षेतील बदल 2025 पासून लागू करा; MPSC च्या विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन

Posted by - January 31, 2023 0
पुणे : राज्यसेवा परीक्षेत 2025 पासून बदल लागू करावेत या मागणीसाठी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनासाठी लाखोच्या…

#PUNE : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन

Posted by - February 24, 2023 0
पुणे : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे आज निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी पुण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *