Sanjay Raut

संजय राऊत यांच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ!

371 0

नाशिक : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून (Nashik Rural Police) त्यांना ही सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
संजय राऊत यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना श्रीकांत शिंदेंबाबत (Shrikant Shinde) प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी थू म्हणत थुंकण्याची कृती केली होती. संजय राऊत यांच्या या कृतीविरोधात शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन सुरू केले आहे.

याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. नाशिक (Nashik)ग्रामीण पोलिसांकडून संजय राऊत यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. संजय राऊत ज्या ठिकाणी मुक्कामी आहेत त्या हॉटेलच्या बाहेर ही सुरक्षा (Security) पुरवण्यात आली आहे.

Share This News

Related Post

Nagpur News

Nagpur News : नागपूर हादरलं ! मोबाईल दिला नाही म्हणून मुलानं आपल्या जन्मदात्या आईला दिली ‘ही’ शिक्षा

Posted by - October 21, 2023 0
नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फसणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका शुल्लक कारणावरून निर्दयी…

रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय? 

Posted by - July 14, 2022 0
अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्यावेळी प्रशासनाकडून नेहमी सतर्कतेचा इशारा दिला जातो. परिस्थितीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड…

राज ठाकरे यांच्या भोंग्याबाबतच्या विधानानंतर नगरसेवक वसंत मोरे संभ्रमात

Posted by - April 5, 2022 0
पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावरून आव्हान देत मशिदीवरील भोंगे हटवण्याबाबत इशारा दिला होता. आता राज…

अखेर नितेश राणे सिंधुदुर्ग न्यायालयासमोर शरण, नितेश राणे यांचे सूचक ट्विट

Posted by - February 2, 2022 0
कणकवली- भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयातील अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला असून त्यांनी कणकवली न्यायालयासमोर शरणागती पत्करली…

देवेंद्र फडणवीस यांचा राज ठाकरे यांना फोन, भाजपच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन

Posted by - June 29, 2022 0
मुंबई- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी ११ वाजता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *