Sanjay Raut

Sanjay Raut : संजय राऊतांनी शिंदे-पवारांना दिले थेट चॅलेंज! म्हणाले ‘हिंमत असेल तर…’

362 0

शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने काही महिन्यांपूर्वी घेतला होता. त्याच निर्णयाची पुनरावृत्ती मंगळवारी अजित पवार गटासंदर्भात पाहायला मिळाली. निवडणूक आयोगाने पक्षाचे संस्थापक शरद पवार यांना धक्का देणारा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचं नाव आणि घड्याळ हे पक्ष चिन्ह अजित पवार गटाच्या ताब्यात दिले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट आव्हानचं दिले.

काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत यांनी शिंदे आणि अजित पवार यांना आव्हान देताना म्हणाले, “तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही स्वत:चे पक्ष स्थापन करा आणि लोकांसमोर जा आणि सांगा की हा माझा पक्ष आहे, मला मत द्या! तुम्ही अशा चोऱ्यामाऱ्या, दरोडेखोरी, लपंगेगिरी करुन राजकारण करणार असाल तर हे तात्पुरतं राजकारण आहे,” असे म्हणाले.

भाजपालादेखील दिला सूचक इशारा
“एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं अभिनंदन भाजपाचे लोक त्यांना पक्ष मिळाल्याबद्दल करत आहेत. पण लक्षात घ्या उद्या तुमचाही पक्ष हातातून जाऊ शकतो. आज मोदी-शाहांची गॅरंटी ही तत्पुरती गॅरंटी आहे. उद्याचा काळ अत्यंत भयंकर आहे आणि भाजपाला याचे परिणाम भोगावे लागतील,” असा सूचक इशारा संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nashik News: मुंबई-आग्रा महामार्गांवर बर्निंग ट्रकचा थरार

Pune Crime News : प्रेमप्रकरण जीवावर बेतलं ! पुण्यातील ‘त्या’ हिरे व्यापाऱ्याची गुवाहाटीमध्ये हत्या

RBI कडून महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द

Bus Fire : महाडजवळ खासगी बसला भीषण आग; 19 जण थोडक्यात वाचले

Share This News

Related Post

Dhule Murder

धुळे हादरलं ! राजकीय वादातून कार्यकर्त्याची निर्घृणपणे हत्या

Posted by - May 26, 2023 0
धुळे : धुळे (Dhule) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये धुळे तालुक्यातील उभंड- पिंपरखेड येथे एका राजकीय कार्यकर्त्याची गोळी…
chagan Bujbal

Nashik Loksabha : नाशिक लोकसभेसाठी भुजबळांच्या ‘या’ कट्टर समर्थकाने घेतला अर्ज

Posted by - April 26, 2024 0
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघ (Nashik Loksabha) आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.…

#VIDEO : कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा ! भाविकांची गर्दी

Posted by - March 22, 2023 0
Edited By : Bageshree Parnekar : चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. नवीन वर्षानिमित्त आज राज्यातील सगळी मंदिरं सुद्धा सजली आहेत.…

अटल बिहारी वाजपेयी जयंती विशेष: अटलजींनी घेतलेले ५ महत्वाचे निर्णय ; ज्यामुळे भारताला मिळाली नवी दिशा

Posted by - December 25, 2022 0
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वाजपेयी यांची आज जयंती. अटलजींची जयंती गुड गव्हर्नन्स डे अर्थात सुप्रशासन दिवस म्हणून साजरा…

राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ ; नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढावेत; मुख्यमंत्र्यांचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Posted by - September 12, 2022 0
मुंबई : सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी राज्यात दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *