ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया… काय म्हणाले राऊत ?

579 0

मुंबई- शिवसेना नेते संजय राऊत यांची अलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील घर ईडीने जप्त केलं आहे. या कारवाई नंतर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘एक रुपया जरी मनी लॉन्ड्रिंगचा आमच्या खात्यात आला असेल आणि आम्ही प्रॉपर्टी घेतली असेल तर आम्ही सर्व प्रॉपर्टी भाजपला दान करू’ असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

संजय राऊत पुढे म्हणाले, ” आम्ही कष्टाच्या पैशातून ही प्रॉपर्टी घेतली आहे. याबाबत कधी कुणी आमची चौकशी केली नाही. विचारणा केली नाही. माझी मालमत्ता जप्त केल्याचं आता मी टीव्हीला पाहिलं. त्यात कोणतंही मनी लॉन्ड्रिंग झालेलं नाही. 2009मधील ही प्रॉपर्टी आहे. इतक्या वर्षानंतर ईडीला त्यात आता मनी लॉन्ड्रिंग दिसत आहे. या जमिनीच्या व्यवहारासाठी एक रुपया जरी आमच्या खात्यात मनी लॉन्ड्रिंगचा आला असेल आणि मनी लॉन्ड्रिंगच्या पैशातून आम्ही प्रॉपर्टी विकत घेतली असले तर आम्ही ही प्रॉपर्टी भाजपला दान करून टाकू”

“राजकीय सूड आणि बदल्यासाठीच हा प्रकार सुरू आहे. कोणत्या थराला हे लोक जातात हे तुम्ही पाहात आहात, असं सांगतानाच कारवाई झाली. ठिक आहे. मराठी माणसाचं हक्काचं घर जप्त केल्याबद्दल आनंद आहे. असंच करत राहिलं पाहिजे. त्यातून आम्हाला लढण्याची प्रेरणा मिळते”

Share This News

Related Post

मिस युनिव्हर्स आणि बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेनला हृदयविकाराचा झटका; इन्स्टा पोस्ट करून म्हणाली, ‘माझं हृदय…!’

Posted by - March 2, 2023 0
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्यावर एन्जिओप्लास्टी…

जन्मदात्या बापावरच केले भर दिवाळीच्या दिवशी कुऱ्हाडीने वार; आरोपी मुलाचा शोध सुरु

Posted by - October 28, 2022 0
गोंदिया : भाऊबीजेच्या दिवशी संपूर्ण देशभरात सणाचा उत्साह होता. पण गोंदियातील सडक अर्जुनी तालुक्यातील मोकासीटोला इथं घडलेल्या हत्याकांडाने एकच खळबळ…

CRIME NEWS : पेट्रोल पंपावरील कर्मचारी महिलेवर भरदिवसा कोयता हल्ला… सीसीटीव्ही व्हिडिओ पाहा

Posted by - August 25, 2022 0
नाशिक : नाशिक जिल्ह्यातल्या पाथर्डी गावाजवळच्या एका पेट्रोल पंपावरील अत्यंत धक्कादायक दृश्ये समोर आली आहेत. अज्ञाताकडून भर दिवसा पेट्रोल पंपावरील…

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

Posted by - June 9, 2022 0
राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चार दिवसांपूर्वी कोरोनाची लागण होती. याबाबत त्यांनी स्वत: ट्वीट करून माहिती…
Arvind Kejriwal

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन

Posted by - June 20, 2024 0
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला असून उद्या अरविंद केजरीवाल हे तिहार जेलमधून बाहेर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *