Sanjay Ghodke

Sanjay Ghodke : ठाकरेंचे कट्टर समर्थक संजय घोडकेंचे निधन; पंढरपूरचे ‘आनंद दिघे’ अशी होती ओळख

632 0

सोलापूर : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान तालुकाप्रमुख तथा पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष संजय दशरथ घोडके (वय 60) (Sanjay Ghodke) यांचे आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

पंढरपूर मधील शिवसेनेच्या स्थापनेपासून संजय घोडके यांचा संघटनात्मक कामात सहभाग आहे. शाखा प्रमुखापासून त्यांचा शिवसेनेतील प्रवास सुरु झाला. पंढरपूर शहर प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आदी पदावर त्यांनी निष्ठेने आणि धाडसाने काम केले. ते लहानपणापासून दिवंगत धर्मवीर आनंद दिघेंचे मोठे चाहते होते. विशेष बाब म्हणजे, त्यांना पंढरपूरचे आनंद दिघे म्हणून देखील ओळखले जात होते.

शिवसेनेच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या ब्रीदवाक्यशी सुसंगत घोडके यांचे कार्य होते. राजकारण, समाजकारण, गोरगरीब, निराधार आदींमध्ये मामा म्हणून संजय घोडके यांची ओळख होती. धर्मवीर आनंद दिघे कला व क्रीडा मंडळ, स्व. मीनाताई ठाकरे नवरात्र महोत्सव मंडळाची स्थापना घोडके यांनी केली होती. परीट समाजाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. घोडके यांच्या अकाली निधनाने पंढरपूर शिवसेनेसह सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे.

Share This News

Related Post

Atul Kulkarni

Sambhaji Bhide : ‘मारलं की मरायचं असतं’; रील शेअर करत अतुल कुलकर्णीचे भिडेंना प्रत्युत्तर

Posted by - July 31, 2023 0
मुंबई : संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वातावरण मोठ्या…

आव्हाडांच्या शुभेच्छांवर अण्णांचे सणसणीत उत्तर, काय म्हणाले अण्णा हजारे ?

Posted by - June 15, 2022 0
अहमदनगर – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आज वाढदिवस. या निमित्त राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांना…
Chappal

चप्पल चोरली म्हणून पट्ठ्याने चक्क 3 जणांविरोधात दाखल केली तक्रार

Posted by - May 22, 2023 0
पुणे : पुण्यामधून (Pune) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये चप्पल चोरल्याच्या प्रकरणात तीन जणांविरोधात चोरीचा (theft) गुन्हा (Crime)…
CM-Revanth-Reddy

Revanth Reddy : अखेर ठरलं ! रेवंत रेड्डी होणार तेलंगणाचे मुख्यमंत्री; हाय कमांडने केलं शिक्कामोर्तब

Posted by - December 5, 2023 0
हैदराबाद : वृत्तसंस्था – तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदासाठी रेवंत रेड्डी यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. काँग्रेस हायकमांडने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले…
Shirur Lok Sabha

Shirur Loksabha : शिरुर मतदारसंघात जोरदार राडा; अमोल कोल्हेंनी ‘तो’ व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप

Posted by - May 13, 2024 0
शिरूर : पहिल्या तीन टप्प्यांनंतर आज देशभरात चौथ्या टप्यातील मतदान (Lok Sabha) पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *