संभाजीराजे छत्रपती हा विषय आमच्यासाठी संपलाय- संजय राऊत

452 0

मुंबई- संभाजीराजे छत्रपती यांचा विषय आमच्या दृष्टीनं संपलेला आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संभाजीराजेंना शिवसेनेची 42 मते देण्यासाठी तयार होतो. ही जागा शिवसेनेची आहे, तुम्ही शिवसेनेचे उमेदवार व्हा, ही आमची अट नव्हती तर भूमिका होती. छत्रपती किंवा राजघराण्याला राजकीय पक्षाचे वावडे नसावे. मोठ्या महाराजांनी शिवसेनेत, काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मालोजीराजे स्वत: संभाजीराजे राष्ट्रवादी, भाजपा आदी पक्षांकडून निवडणुका लढले आहेत. आमदार खासदार राहिले आहेत. यामुळे त्यांच्या समर्थकांचे दावे खोटे आहेत, असे राऊत म्हणाले. 

राज्यात राज्यसभा निवडणुकीवर गोंधळ सुरु आहे. अशातच मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं संजय राऊतांना इशाराही देण्यात आला आहे. संभाजीराजेंच्या अपक्ष उमेदवारीला संजय राऊत सातत्यानं विरोध करताना दिसत आहेत. 2024 ला तुम्हाला याची राजकीय किंमत मोजावी लागेलच पण छत्रपती संभाजीराजे अपक्षच निवडणूक लढवणार, असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं संजय राऊत यांना दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत हेच याला कारणीभूत असल्याचे सांगत मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी संताप व्यक्त केला. यावर राऊत यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या टीकेला उत्तर देताना राऊत म्हणाले, ” याप्रकरणात संजय राऊतांचा व्यक्तीगत काय संबंध आहे? तसेच, शिवसेनेचा काय संबंध आहे? जे अशाप्रकारची वक्तव्य करतात त्यांनी या घडामोडी समजून घेतल्या पाहिजेत. शिवसेनेच्या कोट्यातील एक जागा आम्ही संभाजीराजे छत्रपतींना देण्यासाठी तयार झालो. तो छत्रपतींचा सन्मान राखण्यासाठी त्यांच्या घराण्याचा सन्मान राखण्यासाठी. यापेक्षा अधिक शिवसेना काय करु शकते? हे सांगा.”

“42 मतं संभाजीराजे छत्रपतींना देऊन राज्यसभेवर पाठवण्याचं उद्धव ठाकरेंनी नक्की केलं होतं. त्याबाबत त्यांच्याशी चर्चाही झाली होती. त्यांच्या समर्थकांनी 15 दिवसांतल्या घडामोडी समजून घेतल्या पाहिजेत”

Share This News

Related Post

… अन् क्षणात कोसळलं ट्वीन टॉवर; पाहा व्हिडिओ

Posted by - August 28, 2022 0
नवी दिल्ली: आज नोएडातील अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर पाडण्यात आले आहे. एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचे काम देण्यात…
Ajit Pawar

Ajit Pawar : राज्यातील पाऊस, खते, बी-बियाणे, टँकर, पीक कर्ज, पाणीसाठ्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

Posted by - June 10, 2024 0
मुंबई : राज्यात पुणे विभागासह कोकण प्रदेशात चांगला पाऊस झाला आहे, तर अन्य भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. हवामान…
Congress

Congress : विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसकडून ‘या’ 4 नेत्यांच्या नावाची चर्चा

Posted by - July 16, 2023 0
मुंबई : काँग्रेसच्या (Congress) गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या (Congress) दुसऱ्या फळीतील नेत्याची वर्णी…

पुणे जिल्ह्यातील भुकुम गावाची धुरा भाऊ-बहिणीच्या खांद्यावर

Posted by - April 23, 2023 0
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात एक अनोखा योगायोग पाहायला मिळाला आहे. मुळशीतील भुकूम ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाचा कारभार आता बहीण-भाऊ…

‘तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग’ या विषयावर राज्यस्तरीय परिषदेचे उद्‌घाटन

Posted by - September 14, 2022 0
पुणे : मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग’ या विषयावर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *