Rupali Chakankar

Rupali Chakankar : “ती” चा सन्मान म्हणत रुपालीताई चाकणकर यांनी केला पुर्णांगीनी महिलांचा सन्मान

463 0

पुणे : मकर संक्रांतीच्या नंतर महिलांचे हळदी कुंकू समारंभ जोरात सुरू होतात. महिलांचे छोटे खाणी स्नेह संमेलन असल्या सारखे भेटीगाठी आणि संवाद यातून होत असतो. असाच सोहळा “ती”चा सन्मान म्हणत रुपाली चाकणकर यांनी क्रांतिज्योत महिला प्रतिष्ठान च्या माध्यमातून आयोजित केला होता.

हा हळदी कुंकू समारंभ चे वैशिष्ट्य म्हणजे पूर्णांगिणी महिलांच्या मोठ्या उपस्थितीत हा हळदी कुंक समारंभ संपन्न झाला. “हळदी कुंकू समारंभ हा कोणा महिलेला उपेक्षित ठेवणारा, तिला वेगळी वागणूक देणारा कार्यक्रम न राहता तो सर्वच स्त्रियांचा सन्मान करणारा, सामावून घेणारा कार्यक्रम असला पाहिजे ही माझी भूमिका राहिलेली आहे.” असे यावेळी बोलताना रुपालीताई चाकणकर यांनी सांगितले. तसेच त्या पुढे त्या बोलल्या समाजात विधवा महिलांना वेगळी वागणूक दिली जाते, त्यांना समारंभाच्या पासून बाजूला ठेवले जाते. त्यांना प्रत्येक समारंभात समाविष्ट करता यावे म्हणून राज्य महिला आयोगाच्या विधवा प्रथा बंदीसाठी घेतलेल्या आग्रही भूमिकेमुळे महाराष्ट्रातील तब्बल ५०० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंदीचा ठराव राज्य महिला आयोगाला पाठवलेला आहे. संपूर्ण राज्यात विधवा प्रथा बंदीच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. स्त्री शक्तीच्या सन्मानासाठी उचलले गेलेले हे ऐतिहासिक पाऊल आहे.

स्त्रियांची विधवा हा शब्द वेगळी ओळख करून देत होत्या, तिचे अपूर्ण असणे दाखवत होता तर आयोगच्या माध्यमातून राज्यभरात विधवा स्त्रियांना “पूर्णांगीनी” हा शब्द वापरला जावा हा मी केलेला प्रामाणिक प्रयत्न होता. या पूर्णांगिनी महिलांना कोणतेही धर्मीक कार्य असेल, समारंभ आणि उत्सव असेल त्यात त्यांना सन्मान दिलाच पाहिजे! यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या लेखिका डॉ. प्रतिभा वैद्य यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले, त्या बोलताना म्हणाल्या की महिलांचा अशा प्रकारे सन्मान पहिल्यांदाच होत आहे याचे मला समाधान आहे. यावेळी पूर्णांगीनी महिलांना हळदी कुंकू लावून हा अनोखा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुण्याला विकसित अन् प्रेरणादायी शहर बनवायचंय : सुनील देवधर

Pune Crime News : खळबळजनक ! चक्क पोलिसांनीच टाकला पोलीस ठाण्यात दरोडा

Adv. Yashwant Jamadar : ‘ॲड. यशवंत जमादार’  या मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

Maharashtra Election : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ‘या’ 6 जागांसाठी पुढील महिन्यात होणार निवडणूक

Property News : आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना प्रॉपर्टीतून बेदखल करणार; ‘या’ गावाने घेतला मोठा निर्णय

Buldana Accident : नेमकी चूक कोणाची? भरधाव दुचाकी आणि टेम्पोचा भीषण अपघात

Share This News

Related Post

pune-police

पुण्यातील नामांकित हॉटेल्सवर पोलिसांनी का केली कारवाई ? वाचा काय आहे प्रकरण..

Posted by - May 15, 2022 0
  पुण्यातील उच्चभ्रू भागतील हॉटेल्स आणि बार्सवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच, हॉटेल चालकांवर खटले देखील दाखल करण्यात आले आहे.…
Pune News

Pune Porsche Accident: ‘वडिलांनीच लायसन्स नसताना कार दिली’; अल्पवयीन आरोपीकडून धक्कादायक माहिती उघड

Posted by - May 21, 2024 0
पुणे : पुण्यामध्ये भरधाव वेगात कार चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत (Pune Porsche Accident) ठरलेल्या पोर्शे अपघात प्रकरणामधील अल्पवयीन मुलाच्या वडिलांना…

काँग्रेस गड राखणार की कमळ फुलणार ?; कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल

Posted by - April 16, 2022 0
गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीची…
Chandrakant Patil

Chandrakant Patil : रक्षाबंधनाचा उत्सव हा समाजात बंधुभाव वाढविणारा ठरावा – चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली भावना

Posted by - September 2, 2023 0
रक्षाबंधनाचा उत्सव हा केवळ भाऊ बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न राहता समाजातील बंधुभाव वाढण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा अशी भावना ना. चंद्रकांतदादा…

Lok Sabha Election : ‘या’ मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

Posted by - May 20, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्यात मुंबईत मतदान पार पडतंय. यावेळी अनेक कलाकारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *