Ramdas Athawale

Ramdas Athawale : महायुतीत मागितलेल्या जागा न मिळाल्याने रामदास आठवलेंनी केली ‘ही’ मागणी

290 0

मुंबई : रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महायुतीत तीन पक्षांमध्ये जागावाटपावरून सुरू असलेली रस्सीखेच चुकीची असल्याचं म्हटलं आहे. यामुळे जनतेत चुकीचा संदेश जात असून त्यांनी माझ्याकडून शिकायला हवं असं म्हटलंय. तसंच महायुतीत माझा अपमान झाला तरी मी मोदीजींच्या विचारासोबत असल्याचंही रामदास आठवले यांनी सांगितलं. तसेच त्यांनी आपण मागितलेल्या जागा न मिळाल्याने नाराजीदेखील व्यक्त केली आहे.

नेमके काय म्हणाले रामदास आठवले?
महायुतीत माझा अपमान झाला. तरीही मी महायुतीसोबत आहे. मी पंतप्रधान मोदींच्या विचारासोबत आहे. मी शिर्डीची जागा मागितली होती पण मला मिळाली नाही. मला जागा देण्यास राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोध केला. जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते तेव्हा मी नेहमी त्यांना पाठिंबा दिला होता. आता मी त्यांच्या मुलासाठी प्रचार करणार नाही असंही आठवलेंनी स्पष्ट केलं.

शिर्डीच्या जागेशिवाय आठवले यांनी आणखी दोन जागांचे तिकिट मागितले होते. यामध्ये सोलापूर आणि इशान्य मुंबईच्या जागेचा समावेश होता. त्या जागासुद्धा मला दिल्या नाहीत. त्यामुळे आता आम्हाला कॅबिनेट मिनिस्ट्री मिळायला हवी अशी मागणी आठवले यांच्याकडून करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nashik Firing : नाशिक हादरलं ! भरवस्तीत टोळक्याकडून फायरिंग

Nagpur News : नागपूरमध्ये भीषण अपघात ! भरधाव ट्रकची 10 पेक्षा अधिक वाहनांना धडक

Share This News

Related Post

महाविकास आघाडीच्या तरुण आमदारांनी घेतली शरद पवार यांची भेट

Posted by - March 17, 2022 0
मुंबई- महाविकास आघाडीच्या तरुण आमदारांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आमदार रोहित पवार, आदिती तटकरे, आशुतोष…
Sanjay Raut

Sanjay Raut : राज्यात नामर्दांचं सरकार, गद्दारांसाठी वेगळा कायदा; संजय राऊत यांची सरकारवर टीका

Posted by - November 30, 2023 0
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता…
Anil Gote

Anil Gote : शरद पवारांना मोठा धक्का ! प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे राष्ट्रवादीतून बाहेर

Posted by - August 9, 2023 0
धुळे : पक्षीय गटबाजीच्या राजकारणासाठी आपण अपात्र (Anil Gote) आहोत. यामुळे अशा गटबाजीला कंटाळूनच राष्ट्रवादीतून स्वखुशीने (Anil Gote) बाहेर पडलो,…

UDAY SAMANT : मग गुजरातपेक्षा चांगले पॅकेज तुम्ही का दिले नाही ? नाणार रिफायनरीची 3.5 लाख कोटींची गुंतवणूक तरी गांभीर्याने घ्या !

Posted by - September 13, 2022 0
मुंबई : फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याबद्दल कंठशोष करताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुजरातपेक्षा चांगले पॅकेज देण्यात कमी का पडलो,…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या घरी गणरायाचे घेतलं दर्शन ; म्हणाले हि भेट राजकीय….

Posted by - September 1, 2022 0
मुंबई : बुधवारी महाराष्ट्रात घरोघरी गणपती बाप्पांचा आगमन झाला आहे. अगदी बॉलीवूड स्टार्स पासून नेतेमंडळी आणि सर्वसामान्य भक्तांच्या घरामध्ये गणपती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *