Rohit Pawar

Rohit Pawar : शिंदे सरकारने कोट्यवाधींचा घोटाळा केल्याचा रोहित पवारांचा आरोप

293 0

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. शासकीय आश्रमशाळांमध्ये वाटप करण्यात येणाऱ्या दूध खरेदीमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. पत्रकार परिषदेमध्ये थेट शासकीय कागदपत्रांच्या आधारे रोहित पवार यांनी राज्य सरकारवर 80 कोटींचा दूध खरेदी घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.एका अज्ञात व्यक्तीने आपल्याला या सर्व खरेदीसंदर्भातील फाईल्स पाठवल्याचा दावादेखील रोहित पवारांकडून करण्यात आला.

काय केला आरोप?
दूध खरेदीच्या दरामध्ये फेरफार करुन घोटाळा करण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. “2018-19 च्या करारामधील आकडेवारी विद्यार्थ्यांना देण्यात आलेलं दूध 46.49 रुपये प्रति लिटर दराने खरेदी करण्यात आलं होतं. तर नव्या म्हणजेच 2023-24 च्या करारामध्ये अमूल कंपनीकडून सरकारने 50.75 रुपये प्रति लिटर दराने दूध खरेदी करण्याचं निश्चित केलं. याच दूध खरेदीसाठी 2023-24 मध्ये राज्य सरकारने 164 कोटींची नवी निविदा जारी केली. यानुसार 200 मिली लीटरचे दुधाचे तब्बल 5 कोटी 71 लाख टेट्रा पॅक खरेदी करुन वाटप करण्याचं निश्चित केलं गेलं. म्हणजेच एकीकडे दूध कंपन्या तसेच दूध उत्पादक संघ शेतकऱ्यांकडून दूध विकत घेताना प्रति लिटर केवळ 24 रुपये ते 31 रुपयांचा दर देतात. मात्र राज्य सरकारने आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी 2023-24 मध्ये तब्बल 146 रुपये प्रति लिटर दराने दूध खरेदी केली. आधी हा दर केवळ 50 रुपयांच्या आसपास होता,” असं रोहित पवार म्हणाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Dr. Vijay Bhatkar : महासंगणकाचे जनक आणि ज्येष्ठ संगणक-शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

Prithviraj Chavan : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची लोकसभा निवडणूक 2024 करिता महाराष्ट्राचे प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘हा’ नेता लागला मुख्यमंत्री शिंदेंच्या गळाला

Lok Sabha Elections : सुप्रिया सुळेंचं पुणे पोलीस अधीक्षकांना पत्र; म्हणाल्या…

Pune News : पोलीस दारात दिसताच माफियाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Vakrasan : वक्रासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Jayant Patil

Jayant Patil : जयंत पाटील भाजपात जाणार? शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा मोठा दावा

Posted by - June 20, 2023 0
पुणे : राष्ट्रवादीचे काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) भाजपच्या वाटेवर असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट (Sanjay…

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढत ; शिवसेनेचे ‘ते’ 14 खासदार शिंदे गटाच्या मार्गावर

Posted by - July 18, 2022 0
मुंबई : शिवसेना हा आपलाच पक्ष आहे आणि त्यांचे चिन्हही आपलेच आहे,असा दावा करणाऱ्या शिंदे गटाकडून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर शक्ती…
Pimpri-Chinchwad

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड दहशतवादी विरोधी पथकाची मोठी कारवाई ! बनावट कागद पत्रासह 5 बांगलादेशी नागरिकांना अटक

Posted by - May 28, 2024 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) दहशतवादी विरोधी पथकाकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये बनावट कागद पत्रासह पाच…
Vishal Agrawal

Vishal Agarwal : विशाल अग्रवाल याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Posted by - May 24, 2024 0
पुणे : रविवारी पुण्यात मोठा अपघात (Pune Accident) घडला होता. अल्पवयीन मुलानं भरधाव पोर्शे कार चालवत दोन दुचाकीस्वारांना चिरडलं. या…

पुणे शहरात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने डॉ. नीलम गोर्‍हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी ; वाचाच सविस्तर

Posted by - September 13, 2022 0
पुणे : पुणे आणि परिसरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडला. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. सुरु असलेली पुणे मेट्रोची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *