Prakash Shendge

Prakash Shendge : मराठा आरक्षणाचा पोपट मेलाय; ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचे वादग्रस्त वक्तव्य

965 0

मुंबई : सध्या मराठा आरक्षणावरून वाद निर्माण होताना दिसत आहे. मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्यावर ओबीसी नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी तर हा मुद्दा उचलून धरत मराठ्यांच्या सरसकट आरक्षणाला विरोध केला आहे. यादरम्यान आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मराठा आरक्षणावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले प्रकाश शेंडगे ?
मराठा आरक्षणाचा पोपट मेलाय असे मोठं विधान ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केले आहे. संघर्ष टाळण्यासाठी मराठा समाजानं आरक्षण वाढवून घ्यावं किंवा EWS चा लाभ घ्यावा असा सल्ला देखील शेंगडें यांनी दिला आहे. मराठा समाज मागास नाही, असं कोर्टानंही म्हटलंय. मराठा समाजानं EWSमधून किंवा वाढवून आरक्षण घ्यावं, म्हणजे मराठा-ओबीसी वाद संपेल, असे शेंडगे म्हणाले आहेत.

सरसकट मराठा आरक्षणाला विरोध करण्यावरुन छगन भुजबळांविरोधात सर्वपक्षीय मराठा नेते एकवटलेले असताना..भुजबळांना ओबीसी नेत्यांचं समर्थन वाढलंय. राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळांची भेट घेतली आणि भुजबळांच्या भूमिकेचं समर्थन केलं. या बैठकीत आमदार प्रकाश शेंडगे, प्राध्यापक टी.पी.मुंडे, जे.डी.तांडेल, लक्ष्मण गायकवाड उपस्थित होते. भुजबळांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर ओबीसी नेत्यांनी थेट देशभरातल्या ओबीसी नेत्यांना साद घातली आहे. तसेच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देतील ते सत्तेबाहेर जातील असा खणखणीत इशारादेखील छगन भुजबळांनी सरकारला दिला आहे.

Share This News

Related Post

MAHARASHTRA POLITICS : काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपाच्या वाटेवर ? फडणवीस-चव्हाणांच्या भेटीमुळे चर्चेला उधाण

Posted by - September 2, 2022 0
मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यात भेट झाल्याची माहिती पुढे आली आहे. ही भेट 15…

एकनाथ शिंदे मुंबईत दाखल; थोड्याच वेळात राज्यपालांची भेट घेणार

Posted by - June 30, 2022 0
मुंबई – अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासह आपल्या…

जायकाच्या 550 कोटीच्या वाढीव खर्चाची जबाबदारी कोण घेणार ? विवेक वेलणकर यांचा सवाल (व्हिडिओ)

Posted by - February 22, 2022 0
पुणे- पुणे शहरात निर्माण होणारे संपूर्ण सांडपाणी प्रक्रिया करून नदीत सोडण्यासाठी पुणे महापालिकेने जायका प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या…

तेच मैदान तीच वेळ; उद्धव ठाकरेंच्या सभेला एकनाथ शिंदे देणार प्रत्युत्तर

Posted by - March 19, 2023 0
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जंगी सभा झाली. या बैठकीला उत्तर देण्यासाठी शिंदे गटाने खेड…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *