Vishal Patil

Sangli Loksabha : बंडखोर विशाल पाटलांवर अजून कारवाई का केली नाही? काँग्रेसने केला ‘हा’ खुलासा

272 0

सांगली : लोकसभा निवडणुकीत (Sangli Loksabha) उमेदवारीवरून नाराज झालेल्या काँग्रेस नेत्याची मनधरणी करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले आहे. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या मध्यस्थीनंतर नसीम खान यांनी यु टर्न घेत आपला स्टार प्रचारक पदाचा राजीनामा मागे घेतला. यानंतर महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगलीतील बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावरील कारवाईबाबतही माहिती दिली.

काय म्हणाले विशाल पाटील?
कोल्हापुरात बंडखोरी केल्यानं काँग्रेसने बाजीराव खाडे यांच्यावर कारवाई केली. पण अद्याप सांगलीत विशाल पाटील यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. याबद्दल महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांना विचारले असता ते म्हणाले की, महाविकास आघाडी एकजूट आहे आणि सांगलीची जागा आम्ही शिवसेनेला दिली आहे. विशाल पाटील यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. सांगलीत आमचं समर्थन शिवसेनेच्या उमेदवाराला आहे. तर कोल्हापूरचा उमेदवार इतका महत्वाचा नव्हता.

कोल्हापुरातील बंडखोर नेत्यावर कारवाई
कोल्हापुरात बाजीराव खाडे यांनी शाहू महाराजांविरोधात बंडखोरी केली. यानंतर काँग्रेसने बाजीराव खाडे यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं. बाजीराव खाडे हे टीम प्रियांका गांधींचे सल्लागार होते. त्यांच्याकडे काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव पदाचीसुद्धा जबाबदारी होती. गेल्या 27 वर्षांपासून काम करूनही आपली दखल घेतली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Maharashtra Weather Today : ऊन-पावसाचा खेळ सुरूच! एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे अवकाळी पावसासोबत गारपिटीचा इशारा

Nashik News : सप्तश्रृंगी गडावरून उडी मारून प्रेमी युगुलाची आत्महत्या

Punit Balan : ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’कडून ‘एसएनडीटी‘ला 60 संगणक भेट

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत महाष्ट्रात ‘या’ 11 ठिकाणी होणार हायहोल्टेज सामने

Share This News

Related Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी पैसे वाटल्याच्या ऑडिओ क्लिपवर शिंदे गटाकडून स्पष्टीकरण ; म्हणाले …

Posted by - September 12, 2022 0
आज पैठणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होते आहे. परंतु ही सभा एका व्हायरल ऑडिओ क्लिप मुळे अधिकच चर्चेत आली…
Milind Deora

Milind Deora : मिलिंद देवरांसोबत ‘या’ पदाधिकाऱ्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

Posted by - January 14, 2024 0
मुंबई : काँग्रेसला राज्यात मोठा धक्का बसला आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा (Milind Deora)…

BIG NEWS : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक बिनविरोध होणार? भाजपाची महत्त्वाची बैठक सुरू

Posted by - October 17, 2022 0
मुंबई : अंधेरी पूर्व पोट निवडणुकी बाबत भाजपचा पेज अधिकच वाढत चालला आहे. रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेघदूत या…
Shivsena

Shivsena : शिवसेना कुणाची? ठरवण्यासाठी योग्य पुरावे सादर करा विधीमंडळ सचिवांची दोन्ही गटांना नोटीस

Posted by - October 9, 2023 0
मुंबई : शिवसेना (Shivsena) आमदार अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक ठरलं आहे. आता शिवसेना कुणाची? हे ठरवण्यासाठी विधीमंडळाच्या कार्यवाहीला वेग आला आहे.…
Congress

Lok Sabha Election : काँग्रेसकडून लोकसभेसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर

Posted by - March 24, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. या यादीत 46 उमेदवारांची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *