Ramdas Aathavle and prakash Ambedkar

Ramdas Athawale : अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली; रामदास आठवले यांचे मोठे वक्तव्य

458 0

वाशिम : देशात सध्या आगामी लोकसभा निवडणुकांचे (Ramdas Athawale) वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी लोकसभेसाठी कंबर कसली आहे. लोकसभेसाठी आता जवळपास सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. अकोला मतदारसंघ प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीनं राज्यभरात चर्चेत राहणारा मतदारसंघ समजला जातो. अशातच अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली, असं वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं आहे. रामदास आठवलेंच्या या वक्तव्यानं अकोल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवलेंना अकोल्याची जागा तुम्ही मागणार का? असा प्रश्न विचारला. त्यावेळी अकोल्याची जागा आम्ही प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली, असं मोठं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलं आहे. तसेच, प्रकाश आंबेडकरांना तुमचा पाठिंबा आहे का? असं विचारलं असता, त्यांनी आम्हाला पाठिंबा दिल्यास, आम्हीही त्यांना पाठिंबा देऊ, असंही रामदास आठवले म्हणाले आहेत.

रामदास आठवलेंनी यावेळी बोलताना महाविकास आघाडीला टोलाही लगावला आहे. प्रकाश आंबेडकरांनी दिलेला बारा बारा जागांचा फॉर्म्युला महाविकास आघाडीनं स्विकारावा, असा सल्ला आठवलेंनी दिला आहे. तसेच, जर त्यांनी प्रकाश आंबेडकरांचा फॉर्म्युला स्विकारला, तर आम्हाला त्यांचे बारा वाजवण्यात यश येईल, असा टोला रामदास आठवलेंनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

FASTag : 31 जानेवारीच्या अगोदर करून घ्या ‘हे’ काम अन्यथा तुमच्या कारचा FASTag होणार बंद

Suicide : प्रेम प्रकरणातून तरुणीने फ्लायओव्हरवरून थेट पाण्यात मारली उडी; Video व्हायरल

Sharad Mohol Murder : शरद मोहोळच्या हत्या प्रकरणी विठ्ठल शेलारला अटक ! हा विठ्ठल शेलार नेमका आहे तरी कोण?

Munnawar Rana : लोकप्रिय शायर मुन्नावर राणा यांचं निधन

Uddhav Thackeray : ‘उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर मोठं कांड होणार आहे’; अज्ञात व्यक्तीने केला नियंत्रण कक्षाला फोन

Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट ! आणखी 11 जणांना घेतलं ताब्यात

Share This News

Related Post

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज घेणार राज ठाकरेंची भेट

Posted by - July 15, 2022 0
मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेणार आहे. ही भेट दोन दिवसांपूर्वी होणार होती मात्र पाऊस…
Ajit Pawar

… म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार जाहीर कार्यक्रमात पुढील काही दिवस सहभागी होणार नाहीत; समोर आलं ‘हे’ मोठं कारण

Posted by - October 29, 2023 0
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाले असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करून…

2024 च्या निवडणुकीवर काँग्रेसचे ‘G23’ गटाचे असंतुष्ट नेते काय म्हणाले ?

Posted by - March 17, 2022 0
नवी दिल्ली- काँग्रेसच्या ‘G23’ गटातील नेत्यांना त्यांच्याच पक्षाच्या म्हणजेच काँग्रेसकडून विरोध होत आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी या नेत्यांवर पक्ष फोडल्याचा…

शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; एकनाथ शिंदे यांचे मुख्य नेतेपदी निवड तर दीपक केसरकर मुख्य प्रवक्ते

Posted by - July 18, 2022 0
मुंबई: शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार असून या सुनावणीआधी शिंदे घटना मोठी खेळी खेळली असून…

गंभीर आजाराने त्रस्त असतानाही लक्ष्मण जगताप राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबईत

Posted by - June 10, 2022 0
राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज होणाऱ्या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये चुरशीची लढत आहे. मतदानासाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *