Rakhee Jadhav

Rakhee Jadhav : राखी जाधव मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी, शरद पवार गटाकडून नियुक्ती जाहीर

633 0

मुंबई : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून मुंबई अध्यक्ष बदलण्यात आला असून त्या ठिकाणी राखी जाधव (Rakhee Jadhav) यांची वर्णी लागली आहे. या आधीचे अध्यक्ष नवाब मलिक यांच्याजागी राखी जाधव यांची वर्णी लागली आहे. नवाब मलिक वैद्यकीय जामिनावर असल्यामुळे शरद पवार गटाकडून ही नियुक्ती करण्यात आली. या आधी अजित पवार गटाकडून समीर भुजबळ यांची मुंबईच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नबाव मलिक यांची तुरुंगात रवानगी झाल्यानंतर त्यांच्या कार्याचा अतिरिक्त भार हा महापालिकेच्या गटनेत्या राखी जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर राखी जाधव यांनी शरद पवारांची साथ कायम ठेवली. अखेर त्यांना याचे फळ मिळाले आहे. अजित पवार गटाकडून मुंबई अध्यक्षपदी नवाब मलिक यांच्या ऐवजी समीर भुजबळ यांची नियुक्ती केल्यानंतर शरद पवार गटाकडून देखील अध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शरद पवार गटाने आता राखी जाधव यांची मुंबईच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

कोण आहेत राखी जाधव?
राखी जाधव या मुंबई महापालिकेच्या राष्ट्रवादीच्या गटनेत्या आहेत. राखी जाधव घाटकोपरमधून तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळेंच्या त्या जवळच्या मानल्या जातात.

Share This News

Related Post

आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; अधिवेशनात ‘हे’ मुद्दे गाजणार

Posted by - March 3, 2022 0
आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. 3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. तर, 11…
Narendra Modi

Narendra Modi : नरेंद्र मोदी पुण्यातून लोकसभा लढवणार? भाजपकडून चाचपणी सुरु

Posted by - September 1, 2023 0
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात रंगली आहे. भाजपच्या उच्चपदस्थ…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केले अभिवादन

Posted by - December 6, 2022 0
मुंबई : राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री…

“12 आमदारांची दुसऱ्याच दिवशी नियुक्ती करणार होतो, पण त्या पत्रातील धमकीच्या भाषेमुळे मी सही केली नाही…!” ; तात्कालीन राज्यपाल कोश्यारी यांचा गौप्यस्फोट

Posted by - February 20, 2023 0
मुंबई : विधान परिषदेच्या 78 सदस्यांपैकी बारा सदस्यांची नियुक्ती राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने करत असतात. सध्या या बारा आमदारांच्या नियुक्ती…

“पक्ष देईल तो आदेश पाळणारा मी कार्यकर्ता, मी अपक्ष निवडणूक… !” वाचा सविस्तर

Posted by - October 17, 2022 0
मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकी मधून भाजपने अखेर माघार घेतली. राज ठाकरे यांच्या पत्रानंतर शरद पवार यांनी देखील अंधेरी पूर्व…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *