राज ठाकरे जिंदाबाद होते आणि जिंदाबाद राहतील – वसंत मोरे

358 0

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवर भोंग्यांसदर्भात वक्तव्य केलं.त्या नंतर आपण आपल्या प्रभागात भोंगे लावणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर पुणे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे सध्या चर्चेत आहेत.

पुण्याच्या कोंढवा परिसरात काल (शुक्रवारी) वसंत मोरे समर्थक मुस्लीम समाजबांधवांनी एक मोर्चा काढला होता. या मोर्चात राज ठाकरे आणि साईनाथ बाबर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली, त्यामुळे आता मनसेच्या गोटात पुन्हा तणाव निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. ते म्हणाले,  तारखेच्या गुढीपाडवा सभेत राज ठाकरेंच्या भाषणानंतर मी माझी भूमिका मांडली. मला कायम वाटत होत की माझा भाग शांत असावा. परंतु मी जे बोललो. माझ्या वक्तव्याचा प्रसारमाध्यमातून विपर्यास करण्यात आला. तसेच त्यातून मी राजसाहेबांच्या भूमिकेला विरोध केला, असा प्रचार करण्यात आला.

ते म्हणाले, ‘काल कोंढवा परिसरात मुस्लिम बांधवांनी एका मोर्चेच आयोजन केलं होत, त्यात मी ऐकलं, ते ऐकून मला वेदना झाल्या. मोर्च्यात राज ठाकरे, साईनाथ बाबर यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. त्या घोषणा ऐकून माझ्या मनाला खूप वेदना झाल्या आहेत. राजसाहेब हे जिंदाबाद होते आणि साहेब कायम जिंदाबाद राहतील, अशी मला पूर्ण खात्री आहे, असे वसंत मोरे यांनी सांगितले.

खालील लिंकवर जाऊन वसंत मोरे यांचा व्हिडीओ पाहा 

https://fb.watch/ch21BqHAhR/

 

Share This News

Related Post

Sangli News

मिरजेत गांजाच्या नशेत 20 वर्षीय तरुणाने केले ‘हे’ भयानक कृत्य; जिल्हा हादरला

Posted by - June 3, 2023 0
सांगली : सांगलीमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये सांगलीतील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण (Abduction) करुन तिला मिरजेत नेऊन…

विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपाकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी

Posted by - July 1, 2022 0
राज्यपालांकडून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्यात आले असून त्यात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपने आज राहुल नार्वेकर यांच्या नावाला…
Sanjog Waghere

Ajit Pawar : अजित पवारांना धक्का ! विश्वासू संजोग वाघेरे यांचा ठाकरे गटात प्रवेश

Posted by - December 30, 2023 0
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक…

येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिलं जाईल; कार्यालय तोडफोडीनंतर तानाजी सावंत यांची पहिली प्रतिक्रिया

Posted by - June 25, 2022 0
गुवाहाटी- राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले असून शिवसेनेचे 41 आमदारांसह ते गुवाहाटी दाखल…

#PUNE : मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयतेने मतदान करावे – श्रीकांत देशपांडे

Posted by - February 24, 2023 0
पुणे : लोकशाही प्रक्रीयेत योग्य उमेदवार निवडण्यासाठी मतदान करणे महत्वाचे असून मतदारांनी 26 फेब्रुवारी रोजी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *