POLITICAL SPECIAL EXCLUSIVE REPORT: 1962 ते 2019 पर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचले तब्बल ‘इतके’ अपक्ष आमदार

357 0

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून महाराष्ट्रात राजकीय पक्षांकडून निवडणूक लढण्यासाठी जेवढे इच्छुक असतात तेवढेच अपक्ष निवडणूक लढण्यासाठीही इच्छुक असल्याचा पाहायला मिळालं महाराष्ट्राच्या विधानसभेत 1962 ते 2019 पर्यंत नेमके किती अपक्ष आमदार झाले पाहूयात ‘TOP NEWS मराठी’चा स्पेशल रिपोर्ट…

आपल्यापैकी अनेकांनी नामदार मुख्यमंत्री गणपतराव गावडे हा चित्रपट पाहिला असेल या चित्रपटातून अपक्ष आमदाराची ताकद दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या विधानसभेतही अपक्ष आमदारांचा मोठा बोलबाला पहायला मिळतो. 1962 पासून ते 2019 च्या निवडणुकीपर्यंत तब्बल 16,549 अपक्षांनी निवडणूक लढवली तर यापैकी 245 जणांना निवडणुकीत यश आलाय यामध्ये तीन महिलांचाही समावेश आहे..

कोणत्या निवडणुकीत किती अपक्ष आमदार ?

  • 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर 1962 मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत 437 उमेदवार रिंगणात होते यापैकी 15 अपक्ष उमेदवारांना निवडणुकीत यश मिळालं 

  • 1967 मध्ये 270 जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीत 463 उमेदवारांनी निवडणूक लढवली यापैकी 16 उमेदवारांना निवडणुकीत यश आलं 1962 च्या तुलनेत अपक्ष आमदारांची संख्या एक न वाढली होती 

  • 1972 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 343 अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली यापैकी 23 उमेदवारांना निवडणुकीत यश आलं. 

  • 1978 मध्ये 288 जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीत 894 उमेदवारांनी निवडणूक लढवली यापैकी 28 जणांना यश आलं. 

  • 1980 मध्ये झालेल्या मध्यावर्ती निवडणुकीमध्ये 612 अपक्ष उमेदवारांनी यापैकी दहा जणांना निवडणुकीत यश आलं 

  •  1985 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 1506 अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली यापैकी 20 जणांना निवडणुकीत यश आलं. याच निवडणुकीमध्ये दत्ता सामंत यांच्या पत्नी विनिता सामंत या वरळीतून विजयी झाल्या आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाणाऱ्या त्या पहिल्या अपक्ष आमदार ठरल्या.

  • 1990 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 2286 अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली तर 13 जणांना निवडणुकीत यश मिळालं 

  •  1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 3196 अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली तर निवडणुकीत 45 अपक्ष आमदार विजयी झाले होते. महाराष्ट्राच्या विधानसभेत अपक्ष म्हणून निवडून येणाऱ्या आमदारांचा हा सर्वाधिक आकडा होता

  •  1999 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 837 अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली यापैकी 12 जणांना निवडणुकीत यश आलं 

  • 2004 च्या विधानसभा निवडणुकीत 1083 अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली तर यापैकी 19 जणांना यश मिळालं 

  •  2009 च्या विधानसभा निवडणुकीत 1820 अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली यापैकी 24 जणांना यश मिळालं 

  • 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 1699 अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली तर सात जणांना यश मिळालं 2009 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत अपक्ष आमदारांची संख्या 17 नं घटली होती 

  •  2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 1400 अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले होते. यापैकी 13 जणांना निवडणुकीत यश मिळालं. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत अपक्ष आमदारांची संख्या सहा ने वाढली होती तरी या निवडणुकीत दोन अपक्ष महिला आमदार विजयी झाल्या होत्या यामध्ये साक्री मतदारसंघातून मंजुळा गावित तर मीरा-भाईंदर मतदार संघातून गीता जैन यांचा समावेश होता

1962 पासून 2019 पर्यंत 33570 उमेदवारांनी निवडणूक लढवली तर यापैकी 16549 इतकी अपक्ष उमेदवारांची संख्या होती

 

Share This News

Related Post

एकनाथ खडसे यांचे पुनर्वसन ! राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर

Posted by - June 9, 2022 0
मुंबई- विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर याना संधी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत…

विश्वास गमावल्यासारखे वाटते ? असू शकते डिप्रेशनची सुरुवात, फक्त करा ‘या’ गोष्टी

Posted by - October 3, 2022 0
आयुष्यात बऱ्याच वेळा आपण एकटे आहोत ,आपण काहीच करू शकत नाही का ? आपल्याहून लहान देखील आपल्यापेक्षा अधिक पैसा कमावतात…
Eknath Shinde Sad

Lok Sabha Elections : ‘आता शिंदे राजीनामा देणार का?’ ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याने मुख्यमंत्र्यांना डिवचलं

Posted by - March 13, 2024 0
मुंबई : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचं (Lok Sabha Elections) वार वाहू लागलं आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला निवडणुकीचे वेध लागले असून,…
Report On Voter

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT: लेखाजोखा लोकसभेचा: पुणे,शिरूर,मावळ,बारामती लोकसभा मतदारसंघात किती आहेत मतदार संख्या?

Posted by - April 22, 2024 0
पुणे : देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून देशातील अनेक मतदारसंघांमध्ये हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील शिरूर…

नव्या ऊर्जेने आता ; उत्तरप्रदेशात पराभवाची चिन्ह दिसू लागताच प्रियांका गांधी यांचं कार्यकर्त्यांना पत्र

Posted by - March 10, 2022 0
उत्तर प्रदेश निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होण्याआधी काँग्रेसचे महासचिव प्रियंका गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना निराश होऊ नका, आपली लढाई आता सुरु…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *