Pankaja Munde

Pankaja Munde : ‘अनेक वेळा नाकारलं तरी माझा…’; पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद

364 0

बीड : भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी 4 सप्टेंबरपासून शिवशक्ती परिक्रमा यात्रेला सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जात आहे. पंकजा मुंडे याच्या माध्यमातून आठ दिवस राज्यातील काही जिल्हे पिंजून काढत विविध धार्मिकस्थळे आणि शक्तीपिठांना भेट देत आहेत. शनिवारी रात्री पंकजा मुंडे यांची शिवशक्ती यात्रा बीडमधील पाटोदा येथे पोहोचली आहे. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली.

नेमके काय म्हणाले पंकजा मुंडे?
रात्री उशिरा पंकजा मुंडे या शिवशक्ती यात्रा घेऊन गोपीनाथ गडावरती दाखल झाल्या. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी मी घरी बसले नव्हते. तर, गढूळ परिस्थितीला वैतागले होते असे कार्यकर्त्यांना सांगितले.”अनेक वेळा मला नाकारलं गेलं. तरी देखील मी माझा तोल घसरू दिला नाही.

सध्या वातावरण गढूळ आहे त्यात मला तुरटीचे काम करायचे आहे. याला हाणून पाडण्याचा डाव ही अनेकांचा असेल. कुणीतरी एखादा बॅनर लावेल आणि या यात्रेला बदनाम करण्याचं काम करतील. पण डोक्यावर बर्फ ठेवा. अनेक वेळा मला नाकारलं तरी मी माझा तोच जाऊ दिला नाही तुम्ही देखील आपला तोल जाऊ देऊ नका,” असं म्हणत कार्यकर्त्यांना पंकजा मुंडे यांनी भावनिक साद घातली.

Share This News

Related Post

CHANDRAKANT PATIL : “माझ्या दृष्टीने ह्या वादावर मी पडदा टाकत आहे! आता हा वाद थांबवावा…!” मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा व्यक्त केली दिलगिरी

Posted by - December 12, 2022 0
पुणे : महापुरुषांविषयी केलेल्या अपमानजनक वक्तव्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पुण्यात निदर्शने करण्यात आली. तसेच समता परिषदेच्या कार्यकर्त्याने त्यांच्यावर…
Supriya Sule

‘समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता द्या’; सुप्रिया सुळेंनी संसदेत मांडलं विशेष विवाह विधेयक

Posted by - April 2, 2022 0
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विशेष विवाह विधेयक लोकसभेत सादर केलं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी समलिंगी विवाहांनाही…

रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश कार्यकारीणीची 3 सप्टेंबरला निवडणूक ; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले राहणार उपस्थित

Posted by - September 2, 2022 0
मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) या पक्षाची मुंबई प्रदेश अध्यक्ष आणि कार्यकारीणीची निवडणूक येत्या दि. 3…

Murlidhar Mohol : बिबवेवाडीतील ईएसआयसी रुग्णालय होणार लवकरच कार्यान्वित : मुरलीधर मोहोळ

Posted by - April 27, 2024 0
पुणे : बिबवेवाडी येथील ईएसआयसी अर्थात कामगार विमा रुग्णालयात 100 बेडचे सुसज्ज रुग्णालय कार्यान्वित झाले असून 16 एकर जागेतील सात…

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजेंची आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

Posted by - February 28, 2022 0
मुंबई- सरकारकडून संभाजीराजे छत्रपती यांना चर्चेसाठी निमंत्रण आलं असून आज वर्षा बंगल्यावर सकाळी 11 वाजता चर्चा होणार आहे. अशी माहिती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *