विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राजभवनावर दाखल

200 0

मुंबई – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं असून शिंदे यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

शिंदे बरोबर असणाऱ्या आमदारांमध्ये राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे,  गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह प्रहारचे आमदार आणि शिवसेनेला पाठिंबा देत राज्यमंत्री झालेल्या बच्चू कडू यांचा देखील समावेश आहे.

या बंडाच्या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. थोड्याच वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीतून मुंबईत दाखल झाले. त्यानंतर भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत त्यांनी बैठक घेतली.

उद्धव ठाकरे सरकारविरोधात त्यांच्याच पक्षातल्या आमदारांनी बंड पुकारलं आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या  आमदारांनी बंड पुकारलं आहे तसंच आम्ही पाठिंबा काढणार आहोत असं त्यांनी म्हटलं आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आशिष शेलार यांच्यासह भाजपचे अन्य ज्येष्ठ आमदार उपस्थित आहेत.

 

 

Share This News

Related Post

वयोश्री आणि एडीप योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना उपयुक्त साधनांच्या वाटपासाठी निधी मिळावा; खासदार सुप्रिया सुळे यांची घेतली सामाजिक न्याय मंत्र्यांकडे मागणी

Posted by - December 16, 2022 0
दिल्ली : ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली वयोश्री योजना तसेच दिव्यांगांसाठी असलेल्या एडीप योजनेचे सर्वात चांगले काम बारामती लोकसभा मतदारसंघात झाले आहे.…
Malegaon News

Malegaon News : विहिरीतून पाणी काढताना तोल जाऊन मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - April 5, 2024 0
मालेगाव : नाशिकमधून (Malegaon News) एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. नाशिकच्या मालेगावमध्ये काही भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.…

अन्न व औषध प्रशासनातर्फे पनीर विक्रेत्यावर कारवाई ; 104 किलो पनीरचा साठा जप्त

Posted by - September 29, 2022 0
पुणे : अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवार पेठेतील मे. तिरुमल्ला डेअरी या पनीर विक्रेत्यावर कारवाई करुन २७ हजार ४० रुपये…

डॉ.दाभोलकर यांच्या मेंदू व छातीतून दोन बुलेट्‌स बाहेर काढण्यात आल्या; डॉ. तावरे यांची साक्ष

Posted by - April 28, 2022 0
शवविच्छेदनाच्या प्रक्रियेत डॉ. दाभोलकर यांच्या मेंदू आणि छातीतून दोन बुलेट्‌स बाहेर काढण्यात आल्याचे ससूनचे तत्कालिन वैद्यकीय अधीक्षक डॉ. तावरेंनी न्यायालयाला…
Nashik News

Nashik News : नाशिक हादरलं! गाढ झोपलेल्या पत्नीची हत्या करून आरोपी पतीने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - September 13, 2023 0
नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नाशिकच्या आडगावमध्ये पतीने पत्नीची निर्घृण हत्या करुन स्वतःला संपवल्याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *