अजित पवार भाजपासोबत जाणार? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं…

1273 0

अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत असून यावर आता दस्तुरखुद्द शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांवर शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

पुरंदर तालुक्यातील सिंगापूर येथील एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, “मी सांगतो ते महत्वाचे आहे. तुमच्या मनात असलेली चर्चा आमच्या मनात नाही. राष्ट्रवादीचे सर्व नेते पक्षाला मजबूत करुन समोर नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या शिवाय कोणत्याही चर्चेत तथ्य नाही. अजित पवार यांनी आमदारांची कोणतीही बैठक नाही. शंभर टक्के ही खोटी गोष्ट आहे. अजित पक्षाचे काम करत आहेत. ”

राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार असल्याची शक्यता आहे. अजित पवार भाजपशी हातमिळवणी करण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारे बंडखोरी करून उद्धव ठाकरेंना धक्का दिला होता, त्याच पद्धतीने अजित पवारही शरद पवारांना धक्का देतील, असे बोलले जात आहे, मात्र शरद पवार यांनी ही चर्चा फेटाळली आहे.

Share This News

Related Post

आदिवासींच्या जमिनींच्या प्रश्नावरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विधानसभेत आक्रमक

Posted by - March 11, 2022 0
राज्यातील आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना देण्यासंदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करत, याबाबतचे सरकारने माहिती…
Nitish Kumar

Nitish Kumar : बिहारच्या राजकारणात ‘खेला खोबे’! नितीशकुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

Posted by - January 28, 2024 0
बिहार : वृत्तसंस्था – बिहारच्या राजकारणात पुन्हा उलटफेअर झाला असून नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.…
Chandrayaan-3

Chandrayaan 3: भारतीयांसाठी ऐतिहासिक दिवस! कशी आहे आजची चांद्रयान-3 ची मोहीम?

Posted by - July 14, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील…

PMPML कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनात वाढ होणार – प्रमोद (नाना) भानगिरे

Posted by - December 26, 2022 0
पुणे : PMPML चे कर्मचाऱ्यांना अखेर सातवा वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे. महापालिकेच्या धर्तीवर सातव्या वेतन आयोगानुसार डिसेंबर महिन्याच्या वेतनात…

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर – सहकार मंत्री अतुल सावे

Posted by - October 13, 2022 0
मुंबई : सन २०१७ ते २०२० या कालावधीत पीक कर्जाची नियमीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *