Ram Nath Kovind

One Nation-One Election: माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

498 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘एक देश, एक निवडणूक’ (One Nation-One Election) या सूत्रानुसार निवडणूक घेण्यात काय अडचणी असू शकतात? या संदर्भात विचार करण्यासाठी केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च स्तरीय समितीची स्थापना केली आहे.

केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. परंतु या अधिवेशनाचा अजेंडा काय असणार याबाबत केंद्राने अद्याप काहीही जाहीर केलेले नाही. येत्या 8-10 सप्टेंबर दरम्यान दिल्लीत जी 20 देशांच्या प्रमुखांची बैठक आयोजित केली आहे. ही बैठक संपल्यानंतर लोकसभा अधिवेशनाचा अजेंडा निश्चित केला जाईल, असं केंद्रीय संसदीय कार्य मंत्रालयाच्या सूत्रांंकडून सांगण्यात येत आहे.

2014 साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांनी ‘एक देश, एक निवडणूक’ ही संकल्पना मांडली होती. ‘एक देश- एक निवडणूक’ झाल्यास सर्वात मोठी बचत ही निवडणूक खर्चामध्ये होणार आहे. 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी देशातील विविध राजकीय पक्ष आणि निवडणूक आयोग यांचा मिळून 60 हजार कोटी रुपये खर्च झाला होता. ‘एक देश, एक निवडणूक’ झाल्यास यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.

Share This News

Related Post

Ministry of Defence : निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची भारताच्या नव्या सीडीएस पदी नियुक्ती

Posted by - September 28, 2022 0
नवी दिल्ली : भारत सरकारने लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) म्हणून नियुक्ती केली.…

ज्ञानवापी मशिदीच्या विहिरीत शिवलींग सापडल्याचा दावा ! कोर्टानं दिला महत्वाचा आदेश

Posted by - May 16, 2022 0
नवी दिल्ली- वाराणसी मधील ज्ञानवापी मशिदीच्या विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षानं केला आहे. या दाव्यानंतर कोर्टानं ज्या जागेवर शिवलिंग…

ढाल तलवार, रेल्वे इंजिन ते धनुष्यबाण; कसा आहे शिवसेनेच्या निवडणुक चिन्हाचा इतिहास

Posted by - October 9, 2022 0
मुंबई: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमका कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती मात्र आज…

फडणवीस 10-20 पवार खिशात घेऊन फिरतात – गोपीचंद पडळकर

Posted by - March 11, 2022 0
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात भाजपानं दणदणीत विजय प्राप्त केला असून भाजपा कार्यकर्त्यांकडून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *