Neelam Gorhe

दीपावलीच्या निमित्ताने राज्यातील शेतकरी महिला, उद्योजक यांच्या शेतमालाला भाव आणि असंघटित कामगारांसाठी सरकारने धोरण आखावे

129 0

केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार सुमारे ८० टक्के महिला आर्थिक क्षेत्रात सक्रिय आहेत. यात कृषी क्षेत्रात ३३ टक्के महिला आहेत तर ४८ टक्के महिला स्वयंरोजगार क्षेत्रात आहेत.

दीपावलीच्या निमित्ताने हजारो महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाची प्रदर्शनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विक्री देखील केली आहे.

मात्र शेतकरी महीला आणि शेतमाल प्रक्रिया करणाऱ्या अनेक महिलांना अजूनही त्यांच्या मालाची म्हणावी तेवढी किंमत मिळत नाही. त्यांचा हा रोजगार दिवाळीच्या काळा पुरताच अंशकालीन असतो. या महिलांना आणखी प्रमाणात सक्षम करणे आवश्यक आहे.
केंद्र सरकारने अचानक जाहीर केलेली नोटबंदी झाल्यापासून तर शेतकरी, असंघटित क्षेत्रातील कामगार यांच्या समस्या आणखी वाढल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला पुढील सूचना नीलम गोऱ्हे यांनी केल्या आहेत :

१. अशा प्रकारच्या घटकांना, श्रमिकांना संरक्षण देणे, विकासाच्या संधी देणे ही राज्य सरकारच्या जबाबदारीचा भाग आहे. त्यांच्यासाठी विविध योजना आखणे आणि क्षमता वाढीसाठी धोरण आखणे आवश्यक आहे. २. शेतमालाला भाव देण्याची नीती आयोगाची सूचना कागदोपत्री न राहता त्यावर कार्यवाही करण्यात यावी. ४. शेतकरी महिलांना प्राधान्य क्रम द्यावा. शेतकरी आत्महत्याग्रस्त आणि पावसाने नुकसान झालेल्या शेतकरी कुटुंबाला लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी. ५. असंघटित क्षेत्रातील कामगार आणि विविध प्रकारच्या घटकांना विमा संरक्षणासाठी प्रभावी उपाय योजना लागू कराव्यात.

शेतकरी महिलांना त्यांच्या शेतमालाला हमीभाव आणि विक्रीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा.

Share This News

Related Post

Pune Crime News

Pune Crime News : धक्कादायक ! पोटच्या मुलीची हत्या करून वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या

Posted by - March 19, 2024 0
पुणे : पुण्यातील वाकड परिसरातून (Pune Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आर्थिक विवंचनेतून‎ एका व्यक्तीने पोटच्या…

NIRMALA SITARAMAN : “भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, पण काहींना हे पचणी पडत नाही…” निर्मला सीतारामन यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Posted by - December 12, 2022 0
नवी दिल्ली : आज लोकसभेत बोलत असताना विरोधकांच्या टीकेवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी खेद व्यक्त केला आहे. लोकसभेत बोलताना त्या…
Pune News

Pune News : बेकायदेशीर रित्या जमाव जमा केल्याने रवींद्र धंगेकरांपाठोपाठ भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Posted by - May 18, 2024 0
पुणे : पुण्यात (Pune News) 13 मे रोजी मतदान पार पडले. त्याच्याच आदल्या दिवशी म्हणजेच 12 मे रोजी सायंकाळच्या सुमारास…
Accident News

Accident News : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात; मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

Posted by - July 18, 2023 0
पुणे : पुणे -सोलापूर महामार्गावर केमिकलने भरलेल्या टॅंकरचा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. उरुळी कांचनमधील एलाईट चौकामध्ये हा भीषण…
Wanindu Hasaranga

Wanindu Hasaranga : श्रीलंका संघाला मोठा धक्का! वानिंदू हसरंगाची अचानक टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती

Posted by - August 15, 2023 0
श्रीलंकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाने (Wanindu Hasaranga) अचानक टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने स्वतः श्रीलंका क्रिकेट बोर्डाला याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *