Ajit Pawar

Ajit Pawar : “आता कसं वाटतंय? गार गार वाटतंय” अजित पवारांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

397 0

मुंबई : मागच्या 5 वर्षांपासून राज्यातील राजकीय समीकरणं इतक्या आश्चर्यकारक पद्धतीने बदलली आहेत की, आता काहीही होऊ शकतं यावर सर्वांचाच विश्वास बसला आहे. ज्यांनी भाजपाबरोबर जाणार नाही, असं स्टँपवर लिहून देऊ का? असं विचारलं तेही भाजपाबरोबर गेले. कधीकाळी एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले राजकीय नेते अचानक एकमेकांचे मित्र झाले आणि मतदार मात्र हे पाहून अवाक झाला. यादरम्यान आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये अजित पवार सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्नांवर बोलताना भाजपावर जोरदार टीका करताना दिसत आहेत.

काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडिओमध्ये अजित पवार बोलताना दिसत आहेत, “स्टीलचा भाव 36 हजार रुपये टन होता, आता स्टील 60 हजार रुपये टन झालं आहे. घ्या अच्छे दिन. कमळाबाई, कमळाबाई, घ्या कमळाबाई. सांगतोय राव, घड्याळ, घड्याळ, घड्याळ. काय चाललंय मला तर काही कळतच नाही. आधी वाळुचा दर 1500 रुपये ब्रास होता, आता वाळुचा दर 6 हजार रुपये झाला आहे. घ्या कमळाबाई.”“आधी दुचाकी 50 हजार रुपयांना मिळायची, आता 90 हजार रुपयांना झाली. आता कसं काय वाटतंय? गार गार वाटतंय. आधी गॅस सिलिंडर 350 रुपयांना मिळायचा. इथं महिला मोठ्या संख्येने बसल्या आहेत. 350 रुपयांचा गॅस सिलिंडर आज 1050 रुपये झाला. झाला की नाही? सिलिंडरचा दर तिप्पट वाढला. आता स्वयंपाक करताना कसं बरं वाटतंय का?” असं विचारत अजित पवारांनी भाजपला टोला लगावला.

भाजपवर टीका करणारे अजित पवार आता भाजपबरोबर सत्तेत जाऊन बसल्याने राजकीय वर्तुळात सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

Share This News

Related Post

Sayaji Shinde

Sayaji Shinde : हृदयात ब्लॉकेज, सर्जरी होताच सयाजी शिंदेंनी पोस्ट केला चाहत्यांसाठी व्हिडिओ

Posted by - April 12, 2024 0
मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समोर येत…

सकाळी उठलं की भोंगा सुरू होतो; नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदेंची पुण्यातील मेळाव्यात खासदार संजय राऊतांवर टीका

Posted by - December 4, 2022 0
पुणे: सकाळी उठलं की भुंगा सुरू होतो आणि गद्दार आणि खोके याशिवाय दुसरा काही बोलतच नाही अशा शब्दात खासदार श्रीकांत…
Supriya sule and bujbal

Supriya Sule : भुजबळ साहेब कर्तृत्वानं मोठे, पण…; सुप्रिया सुळेंचा खोचक सल्ला

Posted by - November 27, 2023 0
मुंबई : सध्या राज्यात मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मराठा समाजास…

विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपाकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी

Posted by - July 1, 2022 0
राज्यपालांकडून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्यात आले असून त्यात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपने आज राहुल नार्वेकर यांच्या नावाला…

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांना जामीन; आठ वर्षांनंतर येणार तुरुंगा बाहेर

Posted by - August 20, 2023 0
बोगस लाभार्थीच्या नावे कर्ज काढून अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची फसवणूक केल्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम जामीन मंजूर झाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *