Sharad Pawar And Jayant Patil

Ajit Pawar : अजित पवारांचं समर्थन भोवलं; ‘या’ मोठ्या नेत्यावर राष्ट्रवादीकडून कारवाई

343 0

नागपूर : अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या काही समर्थक आमदारांसह राष्ट्रवादीमधून बंड केल्यामुळे पक्षात मोठी फूट पडली आहे. यामुळे आता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आता राष्ट्रवादीकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कृतीचं समर्थन केलं म्हणून नागपूर ग्रामीणचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यांची पदावरून हकालपट्टी करून कार्याध्यक्ष राजू राऊत यांची नागपूर ग्रामीण राष्ट्रवादीचे हंगामी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यावर पक्षविरोधी कारवाई करावी; सुप्रिया सुळेंचे पवारांना पत्र

अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर राष्ट्रवादीकडून कारवाई करण्यात येत आहे. अशीच कारवाई नागपूर ग्रामीणचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांच्यावर करण्यात आली आहे. त्यांची जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कार्याध्यक्ष राजू राऊत यांची नागपूर ग्रामीण राष्ट्रवादीचे हंगामी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या 9 आमदारांवर होणार शिस्तभंगाची कारवाई; जयंत पाटलांचं मोठं पाऊल

जयंत पाटील यांच्याकडून कारवाई
अजित पवार (Ajit Pawar) यांचं समर्थन केल्यामुळे बाबा गुजर यांच्यावर जयंत पाटलांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यापुढे पक्षाचं चिन्ह वापरु नये जर वापरले तर कायदेशीर कारवाई करु असं पत्र देखील जयंत पाटील यांच्याकडून पाठवण्यात आले आहे.

Share This News

Related Post

Zika Virus

Zika Virus : पुण्यानंतर पंढरपुरात सापडला झिकाचा रुग्ण; मुंबईवरून परतताच पडला होता आजारी

Posted by - November 17, 2023 0
सोलापूर : पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीची तयारी सुरू आहे. 23 नोव्हेंबरला होणाऱ्या कार्तिकी एकादशीसाठी राज्यासह परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.…

पुणे पुन्हा हादरले : लव्ह ट्रँगलमधून तळजाई टेकडीवर तरुणाची हत्या

Posted by - December 10, 2022 0
पुणे : पुण्यामध्ये पुन्हा एकदा क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. तळजाई टेकडीवर एका 19 वर्षे तरुणाची चाकूने वार…

नवीन कामगार कायद्याने सर्वांच्या नोकऱ्या धोक्यात ; केंद्रीय कामगार कायद्या विरोधात राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा लढा सुरू 

Posted by - August 19, 2022 0
पुणे : केंद्र सरकारच्या कामगार कायद्याच्या नवीन धोरणामुळे कामगारांचे संरक्षण धोक्यात आले आहे. येत्या जानेवारी महिन्यात हा कायदा महाराष्ट्रात लागू…

MUNICIPAL ELECTIONS : प्रभाग रचनेच्या निर्णयावरून पुण्यात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने… (VIDEO)

Posted by - August 4, 2022 0
पुणे : 2017 च्या प्रभाग रचनेनुसारच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून या…

आयएनएस विक्रांत बचाव निधीप्रकरण, सोमय्या पिता-पुत्र पोलीस चौकशीला गैरहजर

Posted by - April 9, 2022 0
मुंबई- आय एन एस विक्रांत या युद्धनौका निधी प्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉमबे पोलीस…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *