Sharad-Pawar-vs-Ajit-Pawar

Sharad Pawar : अजितदादांचे गौप्यस्फोट खरे की खोटे? शरद पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

2841 0

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जतमध्ये झालेल्या मेळाव्यात शरद पवारांबाबत (Sharad Pawar) गौप्यस्फोट केले. अजित पवारांच्या या गौप्यस्फोटांनंतर शरद पवारांनी या आरोपांवर खुलासा केला आहे. अजित पवारांनी बोललेल्या बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा कळल्या, असा टोला यावेळी शरद पवारांनी लगावला आहे.

शरद पवार काय म्हणाले?
आज शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी शरद पवार यांना अजित पवार यांनी केलेले आरोप खोटे आहेत का? असे विचारले असता शरद पवारांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. ‘त्यांनी राजकीय निर्णय घेतला तो त्यांचा अधिकार आहे. हा निर्णय त्यांनी आता घेण्याऐवजी त्यांनी निवडणुकीचा फॉर्म राष्ट्रवादीचा भरला. लोकांसमोर राष्ट्रवादीसाठी मत मागितलं असेल तर त्याच्याशी विसंगत भूमिका योग्य नाही. जे दावे करतायत ते राष्ट्रवादीचं तिकीट घेऊन उभे राहिले होते का नाही? याची चौकशी करा. यातून खरं कोण आणि खोटं कोण हे स्पष्ट होईल’, असं शरद पवार म्हणाले.

‘राष्ट्रवादीची स्थापना कुणी केली, लोकांना हे ठावूक आहे, असं असताना कुणी काही बोलत असेल तर त्याबद्दल काय भाष्य करायचं? पक्षामध्ये घेतलेले निर्णय बाजूला ठेवून पहाटे शपथ घेत असेल तर तो शपथविधी पक्षाच्या धोरणाचा भाग होता, असं म्हणता येणार नाही. पण तसं कुणी म्हणत असेल तर त्याकडे फार लक्ष द्यायची आवश्यकता नाही’, असं शरद पवारांनी सांगितलं.तसेच आमच्याकडे किती आमदार, खासदार आहेत ते योग्यवेळी सांगेन, असे सूचक विधानदेखील शरद पवार यांनी यावेळी केले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा रद्द; ‘हे’ कारण आले समोर

Maharashtra Weather : पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला ऑरेंज अलर्ट

Palghar News : धक्कादायक! क्रिकेट सामना बघताना वाद झाला अन् तरुण जीवानिशी मुकला

Solapur News : खळबळजनक ! कारवाई टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या PSI ला अटक

IPL Auction Registration : आयपीएल लिलावासाठी ‘एवढ्या’ खेळाडूंनी केली नोंदणी

Reservation : ओबीसी नेते डॉ. तायवाडे यांच्या विरुद्ध ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल

Rajesh Tope : राजेश टोपेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांकडून दगडफेक

Share This News

Related Post

Akola News

Akola News : अकोला हादरलं ! कुलरचा शॉक लागून पती-पत्नीचा झोपेतच मृत्यू

Posted by - July 31, 2023 0
अकोला : अकोला (Akola News) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अकोला (Akola News) जिल्ह्यातील महान येथे पती-पत्नीचा कुलरचा…
Raosaheb Danve

Manoj Jarange : ‘जर जरांगे पाटील विधानसभेला उभे राहिले तर…’, रावसाहेब दानवेंनी केले मोठे वक्तव्य

Posted by - May 19, 2024 0
पंढरपूर : जर ओबीसीमधून आरक्षण मिळालं नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मैदानात उतरणार असल्याची मोठी घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे…
Ambadas Danve Vs Sandipanrao Bhumre

Ambadas Danve Vs Sandipanrao Bhumre : ‘आज आमची जहागिरी आहे’; अंबादास दानवे आणि संदिपान भुमरेंमध्ये खडाजंगी

Posted by - August 7, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : राज्यात शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात रोज राडा पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये…

गोविंदांना आरक्षण दिलं , धन्यवाद…! पण मराठ्यांच काय ?

Posted by - August 19, 2022 0
राज्य शासनाने काल जाहीर केलं की, गोविंदांना सरकारी नोकरीमध्ये खेळाडू कोट्यातून ५% आरक्षण देण्यात येणार. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे…

नॉट रिचेबल झाल्यानंतर किरीट सोमय्या यांचा व्हिडिओ आला समोर

Posted by - April 12, 2022 0
मुंबई- आयएनएस विक्रांत निधी अपहारप्रकरणी अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर किरीट सोमय्या यांची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *