Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवार 17 ऑगस्टपासून राज्यव्यापी दौऱ्यावर, ‘या’ मतदारसंघातून करणार सुरुवात

1155 0

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) येत्या 17 ऑगस्टपासून राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहेत. कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या बीडमधून ते आपल्या दौऱ्याला सुरूवात करणार आहेत. या अगोदर शरद पवारांनी (Sharad Pawar) पहिली सभा अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांच्या मतदारसंघात घेतली होती.

पहिली सभा नाशिकमध्ये
राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्यानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) राज्यव्यापी दौरा करण्याचं जाहीर केलं होते. त्यानंतर त्यांनी पहिली सभा छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात घेतली होती. त्यानंतर त्यांनी कोणताही दौरा केला नव्हता. पावसाळी वातावरणामुळे त्यांनी दौरा थांबवला होता. पावसाचा अंदाज घेऊन लकरच दौऱ्याची तारीख जाहीर करणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आता 17 ऑगस्टपासून शरद पवार राज्यव्यापी दौर करणार आहेत.

83 वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात
अजित पवारांसह राष्ट्रवादीतले काही आमदार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर पुन्हा एकदा शरद पवारांसमोर आव्हान उभं ठाकलंय. घरातून आव्हान उभं ठाकल्यानंतरही ना पवारांचा मिश्किलपणा कमी झाला, ना लढाऊ वृत्ती. पुन्हा एकदा पक्ष बांधण्यासाठी पवार सज्ज झाले आहेत.वयाच्या 83 व्या वर्षी पवार सज्ज झाले आहेत.

एक मुरब्बी नेता – शरद पवार
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचा उल्लेख करताना एक मुरब्बी नेता म्हणून आवर्जून त्यांची ओळख करून दिली जाते. हाच नेता वयाच्या 83 व्या वर्षी राष्ट्रवादीत पुन्हा एकदा पक्षबांधणी करताना दिसणार आहे. आपल्यांनीच दगा दिलेला असताना ही बंडखोरी उलथून पाडत नव्यानं उभं राहण्याची वेळ पवारांवर आली आहे. न खचता अत्यंत मिश्किलपणे खिलाडूवृत्तीनं पवार या आव्हानाला सामोरे जाताना दिसत आहेत.

Share This News

Related Post

Nashik Copy

मुन्नाभाई स्टाईल कॉपी करणाऱ्या पठ्ठ्याला नाशिक पोलिसांकडून अटक

Posted by - May 30, 2023 0
नाशिक : काही लोक परीक्षेत कॉपी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरत असतात. नाशिकमध्ये तर एका पठ्ठ्याने मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात मुन्नाभाई…

केंद्रीय अर्थसंकल्प 2023: ‘या’ आहेत प्रमूख तरतुदी

Posted by - February 1, 2023 0
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषणाला 11 वाजता सुरूवात केली सुमारे दीड तास त्यांनी…

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आज संसदेत अमित शहा यांच्या कार्यालयात सात वाजता महत्त्वाची बैठक; दोन्हीही राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित

Posted by - December 14, 2022 0
नवी दिल्ली : महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाच्या मुद्द्यावर आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडते आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या…

मोठी बातमी! राष्ट्रपतीपदासाठी या तारखेला होणार मतदान

Posted by - June 9, 2022 0
नवी दिल्ली- निवडणूक आयोगाने भारताच्या 15 व्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार राष्ट्रपतीपदाची निवडणूक 18 जुलै रोजी होणार…

CHANDRAKANT PATIL : 40 टक्के सवलतीबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या समवेत होणार बैठक ; पालिकेने सद्यस्थितीत वाढीव रक्कम घेऊ नये, बैठकीत सूचना

Posted by - September 14, 2022 0
पुणे : मिळकत करामध्ये ४० टक्के सवलत देण्याबाबत आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेणार आहेत. या विषयाबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *