माफी मागा अन्यथा राष्ट्रवादीच्या घेरावास तयार राहा, चंद्रकांत पाटील यांना इशारा

403 0

पुणे – खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बेताल वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला भगिनी चंद्रकांत पाटील जिथे दिसतील, तिथे घेराव घालतील, असा इशारा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शुक्रवारी देण्यात आला.

चंद्रकांत पाटील यांनी सुप्रियाताईंबाबत केलेल्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सारसबाग येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध नोंदविण्यात आला. या वेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच, पाटील यांच्या पुतळ्याला जोडेमार आंदोलनही करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख, मृणाल वाणी, रुपाली पाटील, संतोष नांगरे व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

‘महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील कोथरूड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेले चंद्रकांत पाटील हे पुण्याची व महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचे काम करीत आहेत. सुप्रियाताई यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींविरोधात व समस्त महिला वर्गाविरोधात त्यांनी केलेले वक्तव्य हे निषेधार्ह आणि तितकेच लाजीरवाणे आहे. ‘घरी जा, स्वयंपाक करा, मसणात जा’ ही त्यांची वक्तव्ये महिलांनी चूल व मूल इतक्यापुरतेच मर्यादित राहावे, त्यांना समाजकारणात व राजकारणात वाव नसावा, या मानसिकतेचे प्रदर्शन करणारे आहे’

‘यातून चंद्रकांत पाटील व भाजपची मनुवादी वृत्ती दिसून येत आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अशा प्रकारची वृत्ती लादू पाहणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा आम्ही निषेध करतो. चंद्रकांत पाटील यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्वरित माफी मागावी अन्यथा ते जिथे दिसतील तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला – भगिनी त्यांना घेराव घालतील. त्यासाठी चंद्रकांत पाटील तयार राहा’ असा इशारा शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला.

खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बेताल वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्वरित माफी मागावी असा इशारा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शुक्रवारी देण्यात आला.

Share This News

Related Post

विद्युत रोषणाई ,फुलांची आरास शिवदर्शनचे श्री लक्ष्मीमाता मंदिर नवरात्रौसाठी सज्ज

Posted by - September 24, 2022 0
पुणे : पुण्यातील शिवदर्शन परिसरातील श्री लक्ष्मीमाता मंदिर नवरात्रौनिमित्त सज्ज होत असून संपूर्ण मंदिराला नव्या रंगाने झळाळी आली आहे. मंदिराभवती…

Breaking News ! राणा दांपत्य अजून दोन दिवस कोठडीतच, जामिनावर बुधवारी निर्णय

Posted by - May 2, 2022 0
मुंबई- राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या जामीन…

ब्रेकिंग न्यूज ! १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी एटीएसकडून चौघांना अटक

Posted by - May 17, 2022 0
मुंबई- मुंबईमध्ये १९९३ साली झालेल्या साखळी बॉंबस्फोट प्रकरणी गुजरात एटीएसने चौघांना अटक केली आहे. 1993 साली मुंबईतील विविध ठिकाणी 12…

Breaking News ! २२ प्रवाशांना घेऊन निघालेले नेपाळचे विमान बेपत्ता, विमानात ४ भारतीय प्रवासी

Posted by - May 29, 2022 0
काठमांडू- २२ प्रवाशांना घेऊन निघालेले नेपाळचे तारा एअर विमान बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता या विमानाचा नियंत्रणकक्षाशी…
Bujbal And Jarange

Manoj Jarange : तुम्ही चांगली संधी गमावली… ; छगन भुजबळांनी सांगितली मनोज जरांगेची नेमकी चूक

Posted by - January 27, 2024 0
गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या मराठा आरक्षणाबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *