खासदार नवनीत राणा यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा

506 0

अमरावती- खासदार नवनीत रवी राणा यांना केंद्रीय गृहमंत्रालयाद्वारे वाय प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. या निर्णयामुळे खासदार नवनीत रवी राणा यांचा व्हीव्हीआयपी श्रेणीत समावेश झाला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्देशानुसार खासदार राणा यांना ही वाय प्लस श्रेणीची सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली आहे. संपूर्ण देशात कुठेही फिरतांना आता खासदार नवनीत रवी राणा यांना वाय प्लस दर्जाचे सुरक्षा कवच मिळणार आहे. नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने गृहमंत्रालयाला दिला होता. त्याची गांभीर्याने दखल घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खासदार नवनीत रवी राणा यांच्या सुरक्षेसाठी ही वाय प्लस सुरक्षा यंत्रणा प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्र सरकारने प्रदान केलेल्या या सुरक्षा व्यवस्थेत एस पी ओ, एन एस जीचे कमांडो, सी एस एफ चे बंदूकधारी जवान, शासकीय पायलट कार, दोन स्कॉर्पिओ गाड्या आदी ताफा पुरविण्यात येणार आहे. हे सुरक्षा पथक खासदार नवनीत रवी राणा यांच्या समवेत २४ तास राहणार आहेत.

Share This News

Related Post

कोंढव्यात बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण; दहशतवादी वास्तव्यास असलेली इमारत एनआयएने केली जप्त

Posted by - March 17, 2024 0
कोंढव्यात बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण; दहशतवादी वास्तव्यास असलेली इमारत एनआयएने केली जप्त गेल्या काही दिवसात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पुणे शहर…

पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Posted by - July 5, 2022 0
मुंबई दि 5 : हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा दिलेला इशारा लक्षात घेता तसेच सध्या देखील पावसाचा जोर…
Rahul Shewale

Rahul Shewale : ‘ती चूक आम्ही करणार नाही’; राहुल शेवाळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Posted by - February 16, 2024 0
मुंबई : राज्यात सत्तातरानंतर शिवसेनेचं पहिलंच राष्ट्रीय महाअधिवेशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरमध्ये पार पडणार आहे. या 2 दिवसीय…
Viral Video

Viral Video : “ए भ**, दहशतवादी..बाहेर फेका याला”, भाजपा खासदाराची घसरली जीभ

Posted by - September 22, 2023 0
संतापाच्या भरात अनेक राजकीय नेतेमंडळींची जीभ घसरल्याच्या घटना (Viral Video) आपण अनेकदा पहिल्या असतील. यामुळे अनेक नेत्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे…

महत्त्वाची बातमी : UGC परीक्षा 21 फेब्रुवारी ते 10 मार्च दरम्यान होणार !

Posted by - February 13, 2023 0
महत्त्वाची बातमी : देशभर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने उच्च शिक्षणासंदर्भातील राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाते. त्यानुसार देशभर विविध…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *