Navneet Kaur Rana

Navneet Kaur Rana : अखेर नवनीत राणांना दिलासा; जात प्रमाणबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

268 0

अमरावती : नवनीत राणांच्या (Navneet Kaur Rana) जात प्रमाणपत्र प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी आणि संजय करोल यांच्या खंडपीठात पार पडली असून त्यांनी निकाल जाहीर केला. नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले.त्यामुळे नवनीत राणा यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून नवनीत राणां यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय देण्यात आला होता मात्र आता सर्वोच्च न्यायालया कडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करून नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र 2021 मध्ये अवैध ठरवल्यानंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालया कडून उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती देण्यात आली होती. त्यासोबतच, बोगस जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा दोनही गटाचा युक्तीवाद 28 फेब्रुवारीला पूर्ण झाला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाकडून याप्रकरणाचा निकाल राखून ठेवण्यात आला होता.

नेमके काय आहे प्रकरण?
मुंबई उच्च न्यायालयाकडून 8 जून 2021 रोजी नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने दोन लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावल्या नंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनिल भालेराव या नेत्यांनी राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेणाऱ्या याचिका 2017 साली दाखल केल्या होत्या. राणा यांनी निवडणूक अर्ज दाखल करताना अनुसूचित जमातीबाबत दिलेले प्रमाणपत्र बोगस असून जात प्रमाणपत्र समितीसमोरही त्यांनी खोटा जातीचा दाखला देण्यात आल्याचा दावा या याचिकांच्या माध्यमातून करण्यात आला होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Bharati Pawar : चर्चेतील चेहरा : भारती पवार

Congress : लोकसभेच्या तोंडावर ‘या’ काँग्रेस नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Loksabha : अजितदादांची मोठी खेळी; अखेर ‘तो’ बडा नेता लागला हाती

Sanjay Nirupam : निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

Purvottanasana : पूर्वोतानासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

#PUNE : कसबा पोटनिवडणुकीची उद्या सकाळी दहा वाजता सुरू होणार मतमोजणी; निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष

Posted by - March 1, 2023 0
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणूक ही 26 फेब्रुवारी रोजी पार पडली. या निवडणुकीचा निकाल आता उद्या म्हणजेच दोन मार्चला लागणार…
Pune News

Ajit Pawar : कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका ; मावळात ‘धनुष्यबाण’च चालवा : अजित पवार

Posted by - April 8, 2024 0
पुणे : कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी ‘धनुष्यबाण एके धनुष्यबाण’च चालवावे, अशा स्पष्ट…
devendra-fadnavis

देवेंद्र फडणवीस यांची यशस्वी शिष्टाई; महावितरणचा संप मागे

Posted by - January 4, 2023 0
महाराष्ट्र वीज उद्योगांच्या खाजगीकरण विरोधात बहात्तर तास संप करण्याचा निर्णय महावितरणच्या वतीने घेण्यात आला होता मात्र त्यावर महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री तथा…

नरेंद्र मोदींचा देहू दौरा ; मोदींना देण्यात येणाऱ्या पगड्यांवरून वाद

Posted by - June 13, 2022 0
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या पुणे दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते जगतगुरु संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण…
Anis Sundke

Pune Loksabha : पुणे लोकसभेसाठी MIM कडून अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर

Posted by - April 17, 2024 0
पुणे : अनिस सुंडके नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, लहान भाऊ रईस सूंडके नगरसेवक, तर अनिस सुंडके यांची पत्नी हमिदा सुंडके…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *