chagan Bujbal

Nashik Loksabha : नाशिक लोकसभेसाठी भुजबळांच्या ‘या’ कट्टर समर्थकाने घेतला अर्ज

503 0

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघ (Nashik Loksabha) आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी नाशिक व दिंडोरी मतदारसंघाचे मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीत अर्जविक्री व दाखल करणे सुरू झाले आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत 3 मेपर्यंत असणार आहे.

महायुतीतला तिढा कायम मात्र राष्ट्रवादीच्या ‘या’ पदाधिकाऱ्यांनी घेतला उमेदवारी अर्ज
नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीतच अजूनही प्रश्न कायम असून नाशिकमधून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ हे इच्छुक होते. मात्र, छगन भुजबळ यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत नाशिक लोकसभेच्या निवडणुकीतुन जाहीर माघार घेतली होती. आता छगन भुजबळांच्या माघारीनंतर त्यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी दिलीप खैरे यांच्यासाठी त्यांचे बंधू अंबादास खैरे यांच्याकडून अर्ज घेण्यात आला आहे. नाशिक मंतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार कोण असणार हे निश्चित होण्याआधीच महायुतीतील नेत्यांकडून अर्ज घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार ‘या’ तारखेला दाखल करणार उमेदवारी अर्ज
नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी मिळाली आहे. राजाभाऊ वाजे आणि भास्कर भगरे हे जोरदार शक्तीप्रदर्शन करून 29 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

कसं आहे नाशिक, दिंडोरी लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम?
निवडणूक अधिसूचना घोषित करणे : 26 एप्रिल
उमेदवारी अर्ज भरणे : 26 एप्रिल ते 3 मे (सार्वजनिक सुटीवगळून)
दाखल अर्जाची छाननी : 4 मे
अर्ज माघारी : 6 मे (दुपारी 3 पर्यंत)
मतदान : 20 मे (सकाळी 7 ते सायंकाळी 5)
मतमोजणी : 4 जून (सकाळी 8 पासून)

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Accident News : वाळूच्या हायवाने रिक्षाला धडक दिल्याने भीषण अपघात; 13 जण जखमी

Sangli Loksabha : मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना मोठा धक्का; ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल

Rohit Patil : रोहित पाटलांना मोठा धक्का ! फेसबुक पेज झाले हॅक

Weather Update : पुढील 3 दिवस महत्वाचे ! हवामान खात्याने दिला ‘हा’ नवा अलर्ट

Varsha Gaikwad : उत्तर मध्य मुंबई मधून कॉंग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर

Ajit Pawar : अजित पवार यांना ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट

Loksabha Election : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान; ‘या’ दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Supreme Court : निवडणूक ईव्हीएम वरचं होणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Share This News

Related Post

Vijay Shivtare

Vijay Shivtare: वेळ पडल्यास भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार; शिवतारेंचे मोठे विधान

Posted by - March 22, 2024 0
पुणे : सध्या बारामती लोकसभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी नणंद विरुद्ध भावजय असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता…
Pune News

Devendra Fadanvis : महाआघाडीकडे विकासाची दृष्टी नाही : देवेंद्र फडणवीस यांची टीका

Posted by - April 25, 2024 0
पुणे : महाआघाडीकडे विकासाची दृष्टी नसून, त्यांची अवस्था दिशाहिन झाली आहे. त्यांच्याकडे नेता नाही, नीती नाही आणि नियत ही नाही…

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बजावला मतदानाचा हक्क

Posted by - December 5, 2022 0
गुजरात : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडते आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित…

“12 डिसेंबरचे आंदोलन करण्याची वेळ येणार नाही…!” रिक्षा संघटनांना राज ठाकरेंनी दिले आश्वासन, वाचा सविस्तर

Posted by - November 29, 2022 0
पुणे : रिक्षा संघटनांनी सोमवारी पुण्यामध्ये मोठे आंदोलन उभे केले होते. बेकायदेशीर बाईक आणि टॅक्सीच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.…

पंतप्रधानांचा कार्यक्रम वारकरी संप्रदायाचा होता की भाजपचा ? अंकुश काकडे यांचा सवाल

Posted by - June 14, 2022 0
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथे संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *