Nanded Loksabha

Nanded Loksabha : नांदेडमधल्या मतदानाला लागलं गालबोट; तरुणाने थेट कुऱ्हाडीने EVM फोडलं

458 0

नांदेड : आज देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीच्या (Nanded Loksabha) दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं. यामध्ये महाराष्ट्रातल्या 8 मतदारसंघांचाही समावेश आहे. महाराष्ट्रात सगळीकडे शांततेत मतदान पार पडले मात्र नांदेडमध्ये याला गालबोट लागले. नांदेडमधल्या एका मतदान केंद्रावर एका तरुणाने थेट ईव्हीएम मशीन फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील मतदानकेंद्रावर ही घटना घडली आहे.

काय घडले नेमके?
भय्यासाहेब एडके असं कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडणाऱ्या युवकाचं नाव आहे. मतदान केंद्रावरील पोलिसांनी भय्यासाहेब एडकेला तात्काळ ताब्यात घेतलं आहे. या युवकाने ईव्हीएम मशीन का फोडलं याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. तरुणाने फोडलेल्या या ईव्हीएम मशीनमध्ये एकूण किती मतं होती, तसंच मशीन फुटल्यानंतरही ही मतं सुरक्षित आहेत का? याचा तपास निवडणूक अधिकारी करत आहेत. नांदेडमध्ये भाजपचे विद्यमान खासदार प्रताप चिखलीकर यांची काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांच्याशी थेट लढत होत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Aba Kamble Case : अखेर ! आबा कांबळे खून प्रकरणाचा निकाल लागला; 7 जणांना झाली जन्मठेप

Nashik Loksabha : नाशिक लोकसभेसाठी भुजबळांच्या ‘या’ कट्टर समर्थकाने घेतला अर्ज

Accident News : वाळूच्या हायवाने रिक्षाला धडक दिल्याने भीषण अपघात; 13 जण जखमी

Sangli Loksabha : मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना मोठा धक्का; ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल

Rohit Patil : रोहित पाटलांना मोठा धक्का ! फेसबुक पेज झाले हॅक

Weather Update : पुढील 3 दिवस महत्वाचे ! हवामान खात्याने दिला ‘हा’ नवा अलर्ट

Varsha Gaikwad : उत्तर मध्य मुंबई मधून कॉंग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर

Ajit Pawar : अजित पवार यांना ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट

Loksabha Election : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान; ‘या’ दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Supreme Court : निवडणूक ईव्हीएम वरचं होणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Share This News

Related Post

परिवहन महामंडळ, महामेट्रोबरोबर बैठक घेणार – दादाजी भुसे

Posted by - March 14, 2023 0
मुंबई : पुणे मेट्रोच्या कामामुळे पुणे येथील स्थानिक वाहतूक सेवेत बदल करण्यात आला आहे, त्यामुळे राज्य परिवहन मंडळ आणि महामेट्रोबरोबर…
Rahul Narvekar

Maharashtra Politics : न्यायालयाच्या नोटीसवर राहुल नार्वेकरांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - July 14, 2023 0
मुंबई : उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या…

महिला ST कंडक्टरचे गणवेशातील रिल्समुळे निलंबन योग्य की अयोग्य ?

Posted by - October 4, 2022 0
आजकाल इंस्टाग्राम, फेसबुक यांच्या माध्यमातून अनेक कलाकार रिल्स बनवून त्या पोस्ट करत असतात. त्यापैकी अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड…
sharad-pawar

‘या’ कारणामुळे कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाला; शरद पवारांची प्रतिक्रिया

Posted by - May 13, 2023 0
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnatak Election) निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने (Congress) एक हाती सत्ता…

अधिवेशनात रवी राणा यांचा आक्रमक पवित्रा, “मला बोलूद्या नाही तर मी फाशी घेईन”

Posted by - March 7, 2022 0
शाई फेक प्रकरणात राणा यांना अटक होणार होती मात्र न्यायालयाने राणा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. यानंतर आयुक्त…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *