ओबीसी आरक्षणावरील फडणवीसांचे बोल म्हणजे पुतना मावशीचे प्रेम- नाना पटोले

114 0

मुंबई- ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर भारतीय जनता पक्षाला आता आलेला कळवळा हा केवळ दिखावा आहे. ओबीसी आरक्षणाच्या आजच्या परिस्थितीस केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत. भाजपाचा डीएनए ओबीसी नसून ओबीसीविरोधी आहे आणि आता ओबीसी आरक्षणाबद्दल भाजपा दाखवत असलेले प्रेम हे ‘पुतना मावशीचे प्रेम’ आहे, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

नाना पटोले पुढे म्हणाले की, देशातील आरक्षण संपवणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे आणि तो काही लपून राहिलेला नाही. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा आज जो पेच निर्माण झाला आहे त्याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनीच केली. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार असताना २०१७ साली नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीवेळी फडणवीस यांनी ओबीसींचे रोश्टर क्लिअर करायचे म्हणून एक साधे परिपत्रक काढून जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या.

हे प्रकरण न्यायालयात गेले, त्यानंतर भंडारा जिल्हा परिषदेसह इतर जिल्हा परिषदाही कोर्टात गेल्या. २०१८ साली उच्च न्यायालयाने सांगितले होते की आयोग बसवा परंतु तत्कालीन फडणवीस सरकारने त्यावर निर्णय घेतला नाही म्हणून ओबीसींचे आरक्षण गेले. महाविकास आघाडी सरकार यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले परंतु त्यासाठी आवश्यक असणारा ओबीसींचा डेटा देण्यास केंद्रातील मोदी सरकारनेही नकार देऊन महाराष्ट्र सरकारची कोंडी केली. मध्यप्रदेश मध्ये जेव्हा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा मात्र केंद्रातील मोदी सरकराने त्या सरकारला मदत करण्याची भूमिका घेतली. महाराष्ट्रात भाजपाविरोधी सरकार असल्याने केंद्राने मदत केली नाही.

देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्ष ओबीसी आरक्षणाच्या आजच्या परिस्थितीचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडत आहेत. दोन वर्षे काय केले असा प्रश्न विचारत आहेत. मग फडणवीस सरकारने पाच वर्षे काय केले? त्यांनी आयोग गठीत का केला नाही? इम्पिरिकल डेटामध्ये असंख्य चुका आहेत असा दावा करणाऱ्या फडणवीसांनी मोदी सरकारक़डे हा डेटा कशासाठी मागितला होता? आणि त्याच डेटाचा वापर मोदी सरकार सरकारी योजना राबवण्यासाठी का करत आहे? हे प्रश्न उपस्थित होतातच.

मंडल आयोग लागू केल्यानंतर इतर मागासवर्गीय समाजाला २७ टक्के आरक्षण लागू झाले. ह्या निर्णयाला देशभर भारतीय जनता पक्षानेच तीव्र विरोध केला होता हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह जे भाजपा नेते ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीला दोष देत आहेत त्यांनी आधी आपला इतिहास तपासून पहावा. ओबीसींच्या आरक्षणाचा मारेकरी भारतीय जनता पक्षच आहे, त्याचे खापर दुसऱ्यांवर फोडून भाजपा आपल्या पापातून मुक्त होऊ शकत नाही असंही पटोले म्हणाले.

Share This News

Related Post

Loksabha Election : अखेर ठाकरेंचं ठरलं ! सामनामधून उद्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी होणार जाहीर

Posted by - March 25, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha Election) साठी ठाकरेंचे उमेदवार ठरले आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवाऱ्यांची यादी तयार झाली आहे.…
Double Murder Case

Double Murder Case : दुहेरी हत्यांकाडाने महाराष्ट्र हादरला ! आधी बायकोची केली हत्या आणि नंतर चिमुकल्याचा जीव घेतला

Posted by - August 6, 2023 0
रत्नागिरी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या प्रमाणात खूप वाढ झाली आहे. सध्या रत्नागिरीमध्ये दुहेरी हत्याकांड (Double Murder Case) घडले…
MLA Disqualification

MLA Disqualification : शिवसेनेच्या अपात्र आमदारांबाबत ‘या’ दिवशी होणार अंतिम फैसला

Posted by - September 22, 2023 0
मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यत्र राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या (MLA Disqualification) कारवाईला वेग देण्याचा निर्णय…
Yavatmal News

Yavatmal News : पोहण्याचा मोह बेतला जीवावर ! वर्धा नदीत बुडून 3 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - March 9, 2024 0
यवतमाळ : यवतमाळ (Yavatmal News) जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये महाशिवरात्रीच्या यात्रेवरुन घरी परतताना वर्धा नदीत पोहण्यासाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *