Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : भव्य शक्तिप्रदर्शनात मुरलीधर मोहोळ यांचा अर्ज दाखल

354 0

पुणे : कोथरुड येथील छत्रपती श्री. शिवाजी महाराजांचे स्मारक ते डेक्कन जिमखाना परिसरातील छत्रपती श्री. संभाजी महाराज यांचे स्मारक अशी महर्षी कर्वे रस्त्यावर पदयात्रा काढून पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी (ता. 25) शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला सकाळी साडेनऊ वाजता पुष्पहार अर्पण करून मोहोळ यांच्या पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पुणे शहराच्या विविध भागांतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय आणि महायुतीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या सह शहरातील महायुतीचे सर्व आमदार आणि महायुतीचे प्रमुख पदाधिकारी पदयात्रेत सहभागी झाले होते. सुमारे चार तास पदयात्रा सुरू होती. महर्षी धोफ्लडो केशव कर्वे पुतळा, श्री मृत्युंजयेश्वर मंदिर, श्री दशभुजा गणपती मंदिर, नळस्टॉप मेट्रो स्टेशन, गरवारे महाविद्यालय, स्वातंत्र्यवीर स्मारक या मार्गे खंडोजीबाबा चौकात पदयात्रेचा जाहीर सभेने समारोप झाला.

प्रचारसभा सुरू असताना महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुणे लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या कार्यालयाकडे रवाना झाले. मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, माजी आमदार योगेश टिळेकर, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, मनसे नेते बाबू वागस्कर, राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहर अध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे शहर अध्यक्ष नाना भानगिरे, मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, आरपीआयचे शहर अध्यक्ष संजय सोनावणे या वेळी उपस्थित होते. त्या दरम्यान खंडोजीबाबा चौकातील जाहीर सभेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची भाषणे झाली. छत्रपती श्री. संभाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून सांगता सभेचा समारोप झाला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Salman Khan House Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणात आली ‘ही’ मोठी अपडेट

Dhule Accident : कारची धडक बसल्याने भावा-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

Sankarshan Karhade : राजकारणावर आधारित संकर्षण कऱ्हाडेची ‘ती’ खास पोस्ट चर्चेत

Mumbai Crime : मुंबई हादरली ! सख्या भाऊ बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

Code Of Conduct : मोदी आणि राहुल गांधींकडून आचारसंहितेचा भंग! निवडणूक आयोगाने घेतली दखल

Narayan Rane : ही माझी शेवटची निवडणूक: नारायण राणेंची मोठी घोषणा

Sangli Loksabha : माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर प्रचारादरम्यान दगडफेक

Sharad Pawar : शरद पवार गटाचा जाहीरनामा जाहीर

Tamannaah Bhatia : तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ ! महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स जारी

Weather Update : राज्यात कोसळणार अवकाळी पाऊस; हवामान खात्याने जारी केला अलर्ट

Accident News : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; 12 जण जखमी

Murlidhar Mohol : पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Share This News

Related Post

UPSC Results

UPSC Results : पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने UPSC परीक्षेत मिळवले घवघवीत यश

Posted by - April 17, 2024 0
पिंपरी-चिंचवड : काल UPSC परीक्षाचा निकाल जाहीर झाला. या निकालात पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा देशात 359…
Loksabha 2024

Pune Loksabha : पुणे जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या 1500 तक्रारींवर केली कार्यवाही

Posted by - May 12, 2024 0
पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात ‘सी- व्हिजील’ ॲपच्या माध्यमातून 15 मार्चपासून ते आतापर्यंत प्राप्त 1 हजार 505 तक्रारींपैकी 1…
Datta Dalvi

Datta Dalvi : ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना जामीन मंजूर

Posted by - December 1, 2023 0
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी (Datta Dalvi) यांना आज कोर्टाकडून जामीन…

पुणे शहरात हाय अलर्ट..! कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम द्या, पुणे महापालिकेचे खासगी आस्थापनांना आवाहन

Posted by - July 13, 2022 0
पुणे : पुणे शहर आणि परिसराला येत्या 48 तासात अतिवृष्टीचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे महानगरपालिका…
Sanjay Raut

…. म्हणून काँग्रेस, आप पाठोपाठ शिवसेनेचाही नव्या संसदेच्या उदघाटनावर बहिष्कार

Posted by - May 24, 2023 0
नव्या संसद भवनाचं उद्घाटन हे केवळ आपल्या नावाच्या पाट्या लागाव्यात म्हणून होत आहे. राजधानी दिल्लीत पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *