राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून; 6 दिवस चालणार प्रत्यक्ष कामकाज

110 0

मुंबई: मंत्रिमंडळ विस्तारामुळे रखडलेले राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ते २५ ऑगस्ट दरम्यान होत असून प्रत्यक्ष कामकाज सहा दिवस होणार आहे.

विधानसभेच्या या पावसाळी अधिवेशनात राज्यातल्या सत्तांतरावरून आणि होत असलेल्या टीकेवरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येऊ शकतात. तसेच मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनात ही चर्चेत राहण्याची दाट शक्यता आहे. संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्याने गेल्या मंत्रिमंडळात त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र आता सत्तेची चाकं फिरली आणि एकनाथ शिंदे आणि भाजपचं सरकार आल्यानंतर संजय राठोड, अब्दुल सत्तार अशा आरोप असणाऱ्या मंत्रांनाही मंत्रिपदं मिळाली आहेत. त्यावरून विरोधकांनी आतापासूनच टीकेची झोड उडवलेली आहे. हेच मुद्दे येत्या अधिवेशनातही चांगलेच गाजू शकतात. मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिलेला संधी मिळालेली नाही. हाही मुद्दा येत्या अधिवेशनात विरोधकांकडून उचलून धरला जाणार आहे, त्यामुळे सरकारवर कडाडून टीका होत आहे.

दरम्यान, नव्या सरकारचे हे पहिलेच पावसाळी अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनात राज्यातल्या सत्तांतरावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येऊ शकतात. तसेच मंत्रीमंडळ विस्तारदेखील अधिवेशनात चर्चेत राहण्याची दाट शक्यता आहे. संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्याने गेल्या मंत्रीमंडळात त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र आता सत्तेचे चक्र फिरले आणि संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद मिळाले. त्याचबरोबर अब्दुल सत्तार यांचाही समावेश मंत्रीमंडळात झाल्याने विरोधक सत्ताधाऱ्यांना धोरवर धरू शकतात. मुख्य म्हणजे, राज्यात गेल्या काही दिवसात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. त्यामुळे हा मुद्दादेखील यंदाच्या पावसाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे.

Share This News

Related Post

Ladli Behna Scheme

Ladli Behna Scheme : मध्य प्रदेशच्या निवडणुकीत ‘लाडली बहना’ योजना ठरली ट्रम्प कार्ड

Posted by - December 3, 2023 0
मध्यप्रदेश : वृत्तसंस्था – मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्याच्या निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. यामध्ये मध्यप्रदेश, राजस्थान,…

शिंदे सरकारमधील ‘या’ मंत्र्याला कोरोनाची लागण

Posted by - August 28, 2022 0
मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या काळात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मंत्री संजय राठोड यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी ट्वीटरवर माहिती…
Beed Crime

Beed Crime : शरद पवार गटाच्या नेत्याची पेट्रोल टाकून गाडी जाळली; Video आला समोर

Posted by - February 23, 2024 0
बीड : मनोज जरांगे यांच्या समर्थकाच्या गाडीची तोडफोड केल्याची घटना (Beed Crime) ताजी असताना अजून एक धक्कादायक घटना समोर आली…

ब्रेकिंग न्यूज..पाकिस्तानातील पेशावर मशिदीत स्फोट, 30 ठार, 50 हून अधिक जखमी

Posted by - March 4, 2022 0
पेशावर- पाकिस्तानातील पेशावर येथील मशिदीत आज शुक्रवारी झालेल्या स्फोटात ३० जण ठार झाले आहेत. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात…
sharad pawar

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार; शरद पवारांची मोठी घोषणा

Posted by - May 2, 2023 0
मुंबई: राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची मोठी घोषणा शरद पवार यांनी केले असून लोक माझे सांगाती पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *