मोदी सरकारचा ‘रोजगार मेळावा’ निवडणुकीच्या तोंडावरचा केवळ एक इव्हेंट – अतुल लोंढे

158 0

मुंबई:  केंद्रातील मोदी सरकार ७५ हजार जागांची नियुक्त पत्रे इच्छुक उमेदवारांना देत असल्याचा मोठा गाजावाजा करत आहे. परंतु यातील अनेक जागांच्या परीक्षा दीड दोन वर्षांपूर्वीच झालेल्या असून नियुत्या मात्र प्रलंबित ठेवण्यात आल्या होत्या. आता हिमाचल प्रदेश, गुजरात व इतर निवडणुका होत असल्याने भाजपाला निवडणुकीच्या तोंडावर तरुणांची आठवण झाल्याने नरेंद्र मोदी व भाजपाने रोजगार मेळाव्याचा एक इव्हेंट केला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, मेगा इव्हेंट करण्यात नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांचा कोणी हात धरू शकत नाही. स्टाफ सिलेक्शन, रेल्वे भरती बोर्ड, पोस्ट यासह विविध बोर्डाच्या परीक्षा होऊन दीड वर्ष झाली पण विविध परीक्षा बोर्डानी घेतलेल्या परीक्षांचे निकाल थांबवून पंतप्रधानांना दिवाळीचा इव्हेंट करता यावा म्हणून ही भरती थांबवली. आता हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत तर गुजरातच्या निवडणुकाही लवकरच होत आहेत. या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून आता नियुक्तीपत्र देण्याचा घाट घातला आहेत. श्रम पोर्टलवर २२ कोटी तरुणांनी नोकरी व रोजगारासाठी नोंदणी केली आहे त्यातील फक्त ७ लाख लोकांना नोकरी मिळाली आहे. CMIE च्या मते ४५ कोटी लोकांनी नोकरीची अपेक्षा सोडली आहे. तर केंद्र सरकारी कर्मचा-यांच्या २५ लाख जागा रिक्त आहेत. उपलब्ध नोकऱ्या, नोकरी मागणाऱ्यांची संख्या व बेरोजगारीचा उच्चांक पाहता ७५ हजार नोकऱ्या म्हणजे ‘उंट के मुंह में जिरा’ असेच म्हणावे लागले.

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री असताना ७२ हजार पदांची मेगा भरती करण्याची घोषणा केली होती पण प्रत्यक्षात ते ७२ लोकांनाही नोकऱ्या देऊ शकले नाहीत. फडणवीसांनी नोकर भरती केली नाही तर वेगळीच भरती केली. दुसऱ्या पक्षातील आमदार, खासदारांची भाजपामध्ये भरती केली. मोदी आणि फडणवीस म्हणजे ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी’ असे लोंढे म्हणाले.

Share This News

Related Post

अभिनेता सुनील शेंडे यांचे निधन, मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा

Posted by - November 14, 2022 0
मुंबई : आपल्या चतुरस्त्र अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपट तसेच हिंदी चित्रपट सृष्टी गाजणारे जेष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे सोमवारी निधन…

चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना ‘हे’ महत्वाचे आदेश

Posted by - December 13, 2022 0
पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शाई फेक केली होती. या प्रकरणानंतर…

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात

Posted by - January 30, 2022 0
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.…

विश्वास नांगरे पाटील पुण्याचे नवे पोलिस आयुक्त?; सोशल मीडियावर का होत आहे चर्चा

Posted by - December 20, 2023 0
पुणे: विश्वास नांगरे पाटील http://(Vishwas nangare patil) यांची पुण्याच्या पोलीस आयुक्त पदी निवड झाल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत निमित्त…
Manohar Lal Khattar

Manohar Lal Khattar : हरियाणामध्ये राजकीय भूकंप ! मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा

Posted by - March 12, 2024 0
हरियाणा : लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणातील भारतीय जनता पक्ष आणि जननायक जनता पक्ष युती अखेर आज संपुष्‍टात आली. मनोहर लाल खट्टर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *