shinde and uddhav

Supreme Court : अपात्र आमदार सुनावणी प्रकरणी कोर्टाकडून देण्यात आले ‘हे’ आदेश

383 0

मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये विधानसभा अध्यक्षांना 31 डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी घ्यावी असे आदेश दिले आहेत. मे महिन्यात आम्ही निर्णय दिला होता. आता विधानसभा अध्यक्ष सुनावणी घेऊ शकत नसतील तर आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल असे खडेबोल सर्वोच्च न्यायालयाने सुनावले आहेत.

विधानसभा अध्यक्षांनी 31 डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करावी. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. असं सरन्यायाधीशांनी म्हटलं. अध्यक्ष निर्णय घेत नसल्याने सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली. दिवाळी सुट्टी आणि इतर सुट्टी आहे. त्यानंतर एक महिना आहे. 31 डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय घ्या असे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.

आमदार अपात्रता प्रकरणी याचिका दाखल करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणी पूर्ण करण्यासाठी 29 फेब्रुवारी पर्यंत वेळ मागितला होता. मात्र सर्वोच्च न्यायालायने ही याचिका फेटाळून लावत अध्यक्षांना अनेक संधी दिल्या आता डिसेंबर अखेर सुनावणी पूर्ण करा असं स्पष्ट बजावलं आहे.

Share This News

Related Post

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

Posted by - December 13, 2022 0
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. शरद पवार यांच्या ओक या निवासस्थानी अज्ञात…
Lalbaghcha Raja

Lalbaghcha Raja : लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

Posted by - September 18, 2023 0
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळावर (Lalbaghcha Raja) कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंडळाविरोधात काळाचौकी…
Vikas Lawande

Beed News : दोन्ही मुंडे कुटुंबीयांचं बीड जिल्ह्यातील नेमकं योगदान काय? राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांचा सवाल

Posted by - December 15, 2023 0
बीड : काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये (Beed News) फूट पडली. यामुळे पक्षात शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन…

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचं विश्वस्त मंडळ बरखास्त; उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाचा आदेश

Posted by - September 13, 2022 0
शिर्डी : मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठानं आज शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचं विश्वस्त मंडळ बरखास्त केलं.न्यायमूर्ती आर. डी. धानुका…

MAHARASHTRA POLITICS : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत दाखल सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी 13 जानेवारीला

Posted by - December 13, 2022 0
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षातील दाखल सर्व याचिकांवर येत्या 13 जानेवारीला एकत्रित सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *