Bacchu Kadu

Bachchu Kadu : तलाठी भरती परीक्षेतील गोंधळावरून बच्चू कडूंनी व्यक्त केला संताप; केली ‘ही’ मोठी मागणी

778 0

अमरावती : तलाठी भरती परीक्षेत सावळा गोंधळ सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्व्हर डाऊन असल्यानं परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राबाहेर ताटकळत उभं राहावं लागत आहे. परीक्षेला देखील विलंब झाला आहे. दरम्यान सुरू असलेल्या या सर्व प्रकारावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात 30 ऑगस्टला ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.

काय म्हणाले बच्चू कडू ?
तलाठी भरती परीक्षेत सावळा गोंधळ सुरू आहे. विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावर प्रतिक्रिया देताना आमदार बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्व परीक्षा या प्रामाणिकपने व्हाव्यात, गोंधळ करणाऱ्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे, नाही तर सरकार विरोधात उभं राहू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. 6 महिन्यांच्या कालावधीनंतर सर्व परीक्षा या केरळच्या धर्तीवर केवळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फतच घेण्यात याव्यात. तसेच वर्षभरात ज्या काही स्पर्धा परीक्षा होतील त्या सर्व परीक्षांसाठी मिळून विद्यार्थ्यांकडून केवळ एक हजार इतकेच परीक्षा शुल्क आकारण्यात यावे अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : वडगाव शेरीतील मेळाव्यात भाजपकडून महाविजयाचा निर्धार

Posted by - April 1, 2024 0
पुणे : ‘अन्य पक्षांप्रमाणे आमच्या पक्षातील निवडणुकीत उमेदवारीसाठी (Pune News) स्पर्धा, चुरस असते. पक्षाची उमेदवारी फक्त एकालाच मिळते. पण भारतीय…

अल्पवयीन विद्यार्थिनीवरील अत्याचाराच्या घटनेचा राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून निषेध (व्हिडिओ)

Posted by - March 26, 2022 0
पुणे- शिवाजीनगर येथील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. नराधम…

संत सोपानकाका पालखी मार्ग केंद्राकडे वर्ग करा – विजय शिवतारे

Posted by - April 4, 2022 0
संत सोपानकाका पालखी मार्गाचे काम भरपूर दिवसापासून रखडले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मार्गाचे भूमिपूजन केले होते तरी इथला रस्ता…
Murud-Janjira-Fort

जंजिरा किल्ला आजपासून 3 महिन्यांसाठी पर्यटकांसाठी बंद

Posted by - May 29, 2023 0
मुरुड : ऐतिहासिक जंजिरा किल्‍ला (Janjira Fort) आजपासून पुढील तीन महिने पर्यटकांसह (Tourists) स्थानिकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. अवघ्‍या काही…
Maharashtra Weather

Maharashtra Weather : पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला ऑरेंज अलर्ट

Posted by - December 2, 2023 0
मुंबई : डिसेंबर महिन्यातही राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळताना (Maharashtra Weather) दिसत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *