Govinda

Govinda : गोविंदाचा पत्ता कट; उत्तर पश्चिम मतदार संघात दिसू शकते मराठमोळी अभिनेत्री?

427 0

राज्यातील काही जागांच्या वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. एक पेक्षा जास्त इच्छुक उमेदवार असल्यामुळे नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत स्पष्टता पक्षांमध्ये दिसून येत नाही. मात्र आता एका जागेवर चक्क उमेदवारच मिळत नसल्याची बाब समोर येत आहे. उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघात शिंदे गटाला प्रसिद्ध सिने अभिनेता गोविंदा याला उमेदवारी द्यायची होती मात्र आता गोविंदाच्या जागेवर एखाद्या मराठमोळ्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

महायुतीतील फॉर्मुल्यानुसार उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघ हा शिंदे गटाच्या वाट्याला आला आहे. या जागेवर या आधीच महाविकास आघाडी कडून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच जागेवर अमोल कीर्तीकर यांचे वडील आणि शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. मात्र पुत्र अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी मिळताच गजानन कीर्तिकर हे इच्छुकांच्या शर्यतीतून बाहेर पडले. त्यामुळे या जागेवर अभिनेता गोविंदा याच्या नावाची ही चर्चा सुरू झाली. दोन दिवसांपूर्वीच गोविंदाने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यालाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती. मात्र गोविंदाच्या नावाला स्थानिक नेत्यांचा विरोध असून मराठी भाषिक लोकसंख्या या भागात जास्त असल्यामुळे या जागेवर‌ हिंदी अभिनेत्याला उमेदवारी देऊ नये, अशी स्थानिक पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे.

अभिनेता गोविंदा याने आधी सुद्धा राजकारणात नशीब आजमावले होते. त्यावेळी त्याचे विरोधक असलेले राम नाईक यांनी त्याच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे गंभीर आरोप केले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात वर्चस्व होते. त्यांना पाडण्यासाठी काँग्रेसकडून गोविंदाला उमेदवारी देण्यात आली. आणि गोविंद त्याने पाच वेळचे खासदार असलेल्या नाईक यांचा पराभव केला. मात्र या निवडणुकीमध्ये गोविंदाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि बिल्डर हितेन ठाकूर याची मदत घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. राम नाईक यांनी लिहिलेल्या चरैवेति! चरैवेति!! या पुस्तकात त्यांनी याबाबतचा खुलासा केला. प्रचारासाठी लागणारा पैसा दाऊद इब्राहिम आणि ठाकूर कडून घेतल्याचा गंभीर आरोप गोविंदावर करण्यात आला होता. मात्र पुढे जाऊन गोविंदाने राजकारणातून संन्यास घेतला.

या भागात मुंबईतील प्रसिद्ध फिल्म सिटी आहे. तसेच अनेक सिने अभिनेते, अभिनेत्रींचं वास्तव्य देखील आहे. याच भागातून प्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त हे सुद्धा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यामुळे या भागात सिने कलाकाराला संधी देण्यात येऊ शकते. शिंदे गट एखाद्या मराठमोळ्या अभिनेत्रीला लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. मात्र तिचा शोध अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे गोविंदाला डावलून मराठमोळा अभिनेता किंवा अभिनेत्री या जागेवर उमेदवार म्हणून दिसणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Bharat Ratna Award : भारतरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले ‘हे’ दिग्गज; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या हस्ते झाले वितरण

Ajit Pawar : आधी विरोध केला आता प्रचार करणार; अजितदादांच्या विरोधकांना यंदा करावा लागणार त्यांच्याच उमेदवारांचा प्रचार

LokSabha : शरद पवार गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर

Share This News

Related Post

Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा नांदेडमध्ये दुसरा बळी; दहावीतील विद्यार्थांने संपवले जीवन

Posted by - October 23, 2023 0
नांदेड : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्याचे वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणापायी आज नांदेडमध्ये दुसरा बळी गेला आहे. नायगाव तालुक्यातील…

“भाजप,मनसे हे आमचे जुने सहकारी,त्यांनी साधी विचारपूसही केली नाही…!” वाचा संजय राऊत यांनी ‘का’ केले असे ट्विट

Posted by - November 21, 2022 0
मुंबई : सुमारे तीन महिने तुरुंगात राहिल्यानंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला. त्यानंतर अनेकांनी त्यांची स्वतः भेट घेऊन त्यांच्या…

राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा करावा; अजित पवार यांनी घेतली मुख्यमंत्रींची भेट

Posted by - October 19, 2022 0
पुणे : यंदा राज्यभरात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे, संपूर्ण खरीप पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच सध्या…

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद : “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची तोंड गप्प असल्यामुळं बोम्मई जास्त बोलत आहेत…!” संजय राऊतांचा हल्लाबोल

Posted by - December 23, 2022 0
नवी दिल्ली : राज्य महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापुरात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. कर्नाटकचे…

Devendra Fadnavis : महिला दिनी देवेंद्र फडणवीसांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Posted by - March 8, 2024 0
नागपूर : महिला दिनाच्या निमित्तानं आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक मोठी घोषणा केली. देवेंद्र फडणवीसांनी वडिलांच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *