Manoj Jarange

Manoj Jarange : मी माझ्या भूमिकेवर ठाम; अजूनही वेळ गेलेली नाही जरांगे पाटलांनी पुन्हा दिला सरकारला इशारा

309 0

जालना : आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी राज्यभरातून मराठा समाज अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या बैठकीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे?
‘अपेक्षित नसलेल्या गोष्टी झाल्या की समाज एकवटतो, मराठ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की आम्ही टिकणाऱ्या आरक्षणाच्या बाजूनं आहोत. मी माझ्या समाजाच्या हिताचं बोलत आहे. माझ्या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मला समाजासाठी काम करायचं आहे. या बैठकीला आणखीही मराठे येणार आहेत. समाजाला विचारून समाजाच्या हिताचा निर्णय घेणार आहे. आचारसंहितेच्या अगोदर का नाही आरक्षणाबाबत निर्णय घेतला?’ असा सवाल जरांगे पाटील यांनी यावेळी केला.

जरांगेनी दिला इशारा
‘मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, कोणत्याही बदनामीला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे. मरेपर्यंत मी समाजाच्या बाजूनं उभं राहणार. गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया खूप दिवसांपासून सुरू आहे. आता बैठका घेतल्या तरी गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. आणखी दहा पंधरा गुन्हे दाखल करणार आणि मला ते राज्यातून तडीपार करणार आहेत. तरीही मी समाजाशी नातं तुटू देणार नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम राहणार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही,’ असा इशाराच मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lok Sabha Election : काँग्रेसकडून लोकसभेसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर

Matsyasana : मत्स्यासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Congress

Lok Sabha Election : काँग्रेसकडून लोकसभेसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर

Posted by - March 24, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. या यादीत 46 उमेदवारांची…
Murlidhar mohol

Murlidhar Mohol : उद्योगांच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविणार : मुरलीधर मोहोळ

Posted by - May 8, 2024 0
पुणे : शहरातील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग एमएसएमई आणि स्टार्टॲप्सच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे…

रोहित तू बिनधास्त जा; आर आर आबांच्या लेकाला गडकरींचा शब्द

Posted by - April 6, 2022 0
नवी दिल्ली- आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी आज दिल्लीत नितीन गडकरींची भेट घेतली. गडकरींसोबतचे फोटो शेअर करत…
MNS Worker

MNS Worker : अमित ठाकरेंचा ताफा अडवल्याने संतप्त कार्यकर्त्यांकडून टोलनाक्याची तोडफोड

Posted by - July 23, 2023 0
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा ताफा टोल व्यवस्थापनाने थांबवल्याच्या रागातून…

UDAYANRAJE BHOSALE : 3 डिसेंबरला रायगडावर आक्रोश आंदोलन

Posted by - November 28, 2022 0
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांची अशी अवहेलना होत असते. तरीही त्याबद्दल कोणीही भूमिका मांडत नाही. महाराजांची अवहेलना केली म्हणून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *