Manoj Jarange

Maratha Reservation : मराठा पुन्हा एकवटणार; मनोज जरांगे यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

353 0

बीड : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. सरकारनं मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या भूमिकेवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अजूनही ठाम आहेत. सरकारनं सगे-सोयरे शब्दाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी आता एक मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या घोषणेमुळे पुन्हा एकदा राज्यभरातील मराठा समाज एकवटण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे?
कुणबी आरक्षण आणि सगेसोयरे शब्दाच्या अंमलबजावणीसाठी तब्बल 900 एकर जागेवर सभा घेणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सभेची घोषणा केल्यानंतर सभेसाठी मैदानाच्या पाहाणीला सुरुवात झाली आहे. या सभेची तारीख आणि ठिकाण अद्याप ठरलेलं नाही. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी ही विराट सभा होणार असल्याचे संकेत जरांगे पाटील यांनी दिले आहेत. गृहमंत्र्यांनी सत्तेचा आणि गुंडांचा वापर करून दडपशाही केली, त्यामुळे पुन्हा एकदा शांततेत कोट्यावधी मराठा एकवटणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Beed News : करुणा मुंडेंच्या कार्यक्रमात जोरदार राडा

Pune News : बंगळुरू स्फोटाप्रकरणी एनआयएचं पथक पुण्यात दाखल

Bhopal Fire : भोपाळमध्ये मंत्रालयाला भीषण आग; 4 मजले आगीमध्ये जळून खाक

Maharashtra Politics : ठाकरे गटाचा ‘हा’ मोठा नेता पक्षावर नाराज? कार्यकर्त्यांना केले ‘हे’ भावनिक आवाहन

Naukasana : नौकासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Medha Kulkarni

मेधा कुलकर्णींचं राजकीय पुनर्वसन; राज्यसभेची उमेदवारी जाहीर

Posted by - February 14, 2024 0
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून तीन नावांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि…

भाजपसोबत जाण्याच्या चर्चांवर अजित पवार म्हणाले आता काय स्टॅम्प पेपरवर…..

Posted by - April 18, 2023 0
मागील अनेक दिवसांपासून अजित पवार भाजपासोबत जात सरकार स्थापन करतील अशा चर्चा असतानाच आता स्वतः अजित पवार यांनी याबाबत खुलासा…
Eknath And Devendra

Nashik Loksabha : भाजपने शिवसेनेला नाशिकच्या जागेसंदर्भात दिला ‘हा’ प्रस्ताव

Posted by - April 21, 2024 0
नाशिक : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन आपण नाशिक लोकसभा (Nashik Loksabha) लढवणार नसल्याचे जाहीर…

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रकृती अस्वाथ्यामुळे महाप्रबोधन यात्रेला अल्पविराम; विरोधकांनी पुन्हा तयार रहा…!

Posted by - December 9, 2022 0
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेते विविध यात्रा, सभा, दौरे या माध्यमातून पक्ष आणि संघटना एकसंध ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत.…

#BJP : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची भाजपची उमेदवारी हेमंत रसाने यांना जाहीर !

Posted by - February 4, 2023 0
पुणे : पुण्यातील कसबा मतदार संघाची भाजपची उमेदवारी आज जाहीर झाली असून, कसबा पोटनिवडणुकीसाठी पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *