Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; उपचार घेण्यास दिला नकार

462 0

जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आमरण उपोषण सुरु केलं आहे. उपोषणाचा चौथा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. तरीही त्यांनी उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. जरांगे पाटील यांना बोलताना त्रास होत आहे. मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केले आहे.

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला राज्यातील अनेक भागात पाठिंबा मिळत आहे. राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात 307 गावात नेत्यांना गावबंदी करण्यात आली असून 107 गावात साखळी उपोषण सुरू करून जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यात आलाय.

Share This News

Related Post

मुख्यमंत्र्यांकडून मुंबई मेट्रोला हिरवा झेंडा, पहिले तिकीट काढून मेट्रो प्रवासाचा घेतला आनंद

Posted by - April 2, 2022 0
मुंबई- गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांना गिफ्ट मिळाले आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई मेट्रो 2A, आणि मेट्रो 7 या…
Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule : माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेंना भाजपकडून कोणतीही ऑफर नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

Posted by - January 17, 2024 0
सोलापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आपल्याला आणि मुलगी प्रणिती शिंदेंना भाजपने ऑफर…

CHANDRASHEKHAR BAVANKULE : बारामतीच्या विजयासाठी वचनबध्द व्हा

Posted by - September 6, 2022 0
बारामती : बारामती मतदारसंघातून मागील 40 वर्षांपासून सत्ता चालविली जातेय. त्याचसाठी जनतेने मते दिली आहेत. हे मतांचे कर्ज असल्याने बारामतीचा…

मोठी बातमी ! गुणरत्न सदावर्ते यांच्या सुनावणीला सुरूवात

Posted by - April 9, 2022 0
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना शुक्रवारी (दि.8 एप्रिल) राहत्या घरातून…

वीज प्रकल्पांना येणार गती ; वीज मनोरे व वाहिन्या उभारण्यासाठीच्या जमिनीसाठी मोबदल्याचे सुधारित धोरण

Posted by - October 12, 2022 0
मुंबई : अति उच्च दाब पारेषण वाहिन्यांसाठीच्या मनोऱ्यांसाठी जमिनीचा मोबदला देण्याकरिता सुधारित घोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *