Mahayuti

Mahayuti : महायुतीचा रविवारी संयुक्त मेळावा पार पडणार

431 0

पुणे : भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय (ए) शिव संग्राम आणि मित्र पक्षांचा पुणे जिल्ह्याचा पहिला संयुक्त मेळावा (Mahayuti) रविवारी तारीख 14 म्हात्रे पुलाजवळील डीपी रस्त्यावरील शुभारंभ मंगल कार्यालयात दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्व 38 जिल्ह्यांमध्ये संयुक्त मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यानुसार हा मेळावा होणार आहे. प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार या मेळाव्यात मार्गदर्शन करतील.

लोकसभा निवडणुकीचे कामाचे व्यवस्थापन करणे, मोदी सरकारच्या लोकोपयोगी योजना, देशातील महायुती सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संवाद साधणे आणि विविध प्रकल्प व विकास कामांची माहिती नागरिकांना देणे अशा प्रकारचे नियोजन मेळाव्यात करण्यात आले आहे. घटक पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाने काम व्हावे हाही मेळाव्याचा उद्देश आहे.

‘या’ वेळी पुढील पदाधिकरी उपस्थित होते.
भाजप
मुरलीधर मोहोळ
धीरज घाटे.
संदीप खर्डेकर. ( समन्वयक महायुती, पुणे )

आर पी आय (ए) परशुराम वाडेकर.
ऍड मंदार जोशी
संजय सोनवणे.

राष्ट्रवादी दीपक मानकर.
सुरेश घुले.
प्रदीप गारटकर.

शिवसेना
प्रमोद तथा नाना भानगिरे
संजय मशीलकर.
किरण साळी.

शिवसंग्राम संघटना.
भरत लगड

Share This News

Related Post

#NEWS DELHI : आदमी पक्षाच्या शैली ओबेरॉय बनल्या दिल्लीच्या नव्या महापौर

Posted by - February 22, 2023 0
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत तीन अयशस्वी प्रयत्नांनंतर अखेर बुधवारी दिल्लीच्या महापौरपदाची निवडणूक पार पडली. दिल्लीच्या महापौरपदाच्या निवडणुकीत आम आदमी…

Lok Sabha Election Result 2024 Live Updates : नागपूर मधून नितीन गडकरी विजयी

Posted by - June 4, 2024 0
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील निकालांकडे केवळ राज्यातील जनतेचेच नाही तर…

पंतप्रधानांच्या पुणे दौरा पार्श्वभूमीवर काळे कपडे घालून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

Posted by - March 6, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. मात्र, पंतप्रधानांच्या या दौऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसने…

अखेर ठरलं ! पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना “या” दिवशी होणार जाहीर

Posted by - January 30, 2022 0
पुणे महानगर पालिका निवडणुकीचा प्रारूप प्रभाग आराखडा एक फेब्रुवारी रोजी जाहीर होणार असून त्यानंतर 1 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान…

नोटबंदीला सहा वर्षे पूर्ण; नोटबंदीनं काय साध्य झालं?

Posted by - November 8, 2022 0
आज 8 नोव्हेंबर 8 नोव्हेंबर 2016 ही तारीख भारताच्या आर्थिक इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *