Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढत ; शिवसेनेचे ‘ते’ 14 खासदार शिंदे गटाच्या मार्गावर

224 0

मुंबई : शिवसेना हा आपलाच पक्ष आहे आणि त्यांचे चिन्हही आपलेच आहे,असा दावा करणाऱ्या शिंदे गटाकडून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन देखील केले जात आहे. शिवसेना आमदारानंतर आता शिवसेनेचे खासदार देखील मोठ्या प्रमाणावर शिंदे गटाच्या मार्गावर असल्याचं सातत्याने निदर्शनास येत आहे.

दरम्यान संसदेच्या अधिवेशनात शिवसेनेच्या खासदारात फूट निर्माण करण्यात येईल अशी शक्यता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी देखील वर्तवली होती. दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या एका ऑनलाईन मीटिंगमध्ये शिवसेनेचे तब्बल 14 खासदार उपस्थित असल्याचे समजते आहे. यासह आणखी दोन खासदार देखील शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे समजते आहे.  यामुळे शिवसेना खासदारातील मोठी फूट पाहता उद्धव ठाकरे अडचणी वाढत आहे. दरम्यान श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी यांच्यासह आणखी बारा आमदार नक्की कोण होते हे लवकरच समजेल.

शिंदे गटाकडून शिवसेनेची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली असून, एकनाथ शिंदे यांची मुख्य नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख पदी कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. दीपक केसरकर यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या 14 खासदारांविषयी केसरकर यांच्याकडे विचारणा केली असता ,त्यांनी मात्र स्पष्ट बोलणे टाळले आहे . परंतु सर्व खासदार आमच्या सोबत असल्याचे देखील सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.

Share This News

Related Post

Hasan Mushrif

हसन मुश्रीफ यांना मुंबई न्यायालयाचा दणका ! अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Posted by - April 11, 2023 0
राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्यामागे सध्या सध्या ईडीचा ससेमिरा लागला आहे. मुश्रीफ यांनी अटकेपासून…

महत्वाची बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Posted by - January 17, 2023 0
पुणे : महानगरपालिका निवडणुकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत असून त्याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष…

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर

Posted by - April 20, 2022 0
सातारा – खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी सातारा जिल्हा न्यायालयाने ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना…

#Crime News : कोल्हापुरातील जयंती नाल्यात आढळला महिलेचा मृतदेह; हत्या की घातपात, तपास सुरू …

Posted by - January 28, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापुरात आज एका महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे . कोल्हापुरातील जयंती नाल्यात जलशुद्धीकरण केंद्राजवळ एका महिलेचा…

पुरोगामी महाराष्ट्रातील जात्यांध्य व धार्मिक विचार थांबवा !: नाना पटोले

Posted by - May 1, 2022 0
महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराने वाटचाल करणारे राज्य आहे. हा पुरोगामी विचारच राज्याला प्रगतीपथावर घेऊन गेला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *