Eknath And Ajit Pawar

Maharashtra Politics : छ. संभाजीनगरमध्ये महायुतीला मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने भरला अपक्ष अर्ज

268 0

छ. संभाजीनगर : छ. संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळातुन (Maharashtra Politics) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांनी लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. मनोज घोडके यांची उमेदवारी कायम राहिल्यास या मतदारसंघामध्ये ओबीसींच्या मतांमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज मागे घेणार नसून पूर्ण ताकतीने निवडणूक लढू आणि ओबीसी समाजाचा एक खासदार संसदेत पाठवू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. छगन भुजबळ यांनी आयुष्यभर दुसऱ्यांना तिकीटं देण्याचं काम केलं मात्र त्यांना तिकीट मिळत नाही. महायुतीला ओबीसीच्या मतांची गरज नसल्यामुळे आमचा प्रतिनिधी असावा म्हणून अर्ज दाखल केल्याचं घोडके यांनी सांगितले.

कोण आहेत मनोज घोडके ?
घोडके हे राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत, सोबतच ते समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष देखील आहेत. भुजबळ यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांना ओळखले जाते. घोडके यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिल्यास छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात ओबीसी मतांमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. या सगळ्यांचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Naseem Khan : काँग्रेस नेते नसीम खान यांनी तडकाफडकी स्टार प्रचारकपदाचा दिला राजीनामा

Hingoli News : कूलरची हवा बेतली जीवावर !14 वर्षीय विद्यार्थ्यांला गमवावा लागला जीव

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर पहाटेच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्सला भीषण आग

Share This News

Related Post

Sanket Bhosle Murder Case : संकेत भोसले हत्या प्रकरणी मुख्य आरोपी कैलास धोत्रेला अटक

Posted by - February 23, 2024 0
ठाणे : संकेत भोसले हत्या प्रकरणी (Sanket Bhosle Murder Case) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी भिवंडी…
Congress MLA Arrested

Congress MLA Arrested : हिंदूंबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या ‘या’ काँग्रेस आमदाराला अटक

Posted by - November 8, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आसाम पोलिसांनी हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या एका आमदाराला अटक (Congress MLA Arrested) केली आहे.…

भीमा सहकारी साखर कारखान्यात 500 कोटींचा भ्रष्टाचार; संजय राऊत यांचे फडणवीसांना पत्र, वाचा सविस्तर

Posted by - March 13, 2023 0
भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये 500 कोटी रुपयांचे मनी लॉन्डरिंग झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान याप्रकरणी ईडी…

36 आमदार सोबत एकूण संख्याबळ 50 पर्यंत जाईल – बच्चू कडू

Posted by - June 22, 2022 0
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्याच विरोधात बंडाचे अस्त्र उगारलं असून शिंदे शिवसेनेच्या आमदारांसह सुरत मध्ये दाखल झाले होते त्यानंतर…
Maratha Reservation

Maratha Reservation : आणखी एक बळी ! मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोर तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - December 14, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : राज्यात आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात पेटला आहे. तर दुसऱ्या बाजूला या आरक्षणासाठी (Maratha Reservation) लोकांच्या आत्महत्येचे प्रमाण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *