shinde and uddhav

नैतिकता असल्यास शिंदे- फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

491 0

मुंबई : मागच्या काही महिन्यांपासून बहुचर्चेत असणारा राज्यातील सत्तासंघर्षाचा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) जाहीर केला आहे. हा निर्णय उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिलासा देणारा आहे. तसेच कोर्टाच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मोठा धक्का बसला आहे. या निर्णयानंतर आता ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

नैतिकतेच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संजय राऊत आणि अनिल परब यांनी केली आहे.’उद्धव ठाकरेंचं सरकार बेकायदेशीरपणे घालवलं आणि हे सरकार घटनाबाह्य आहे. 16 आमदारांचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे येणार असेल तर येऊ द्या, व्हीपच बेकायदेशीर आहे. संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर आहे.

तसेच विधानसभा अध्यक्षांनी या बेकायदेशीर प्रक्रियेवर भूमिका घ्यायला पाहिजे. शिंदे आणि फडणवीस यांनी उगाच पेढे वाटू नयेत, थोडीतरी नैतिकता असेल आणि खोक्यांची पापं धुवून काढायची असतील, तर सरकारने ताबडतोब राजीनामा द्यायला हवा,’ अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी केली. एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला नाही तरी हे सरकार 15 दिवसांमध्ये कोसळेल अशी प्रतिक्रिया अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे.

Share This News

Related Post

Suicide News

Suicide News : हसत्या खेळत्या कुटुंबाने अचानक संपवले जीवन; मोबाईल तपासताच धक्कादायक कारण आले समोर

Posted by - September 14, 2023 0
कोची: केरळमधील एका हसत्या खेळत्या कुटुंबाने अचानक आपल्या आयुष्याचा शेवट (Suicide News) केला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. इर्नाकुलमच्या वालिया…

अधिवेशनात रवी राणा यांचा आक्रमक पवित्रा, “मला बोलूद्या नाही तर मी फाशी घेईन”

Posted by - March 7, 2022 0
शाई फेक प्रकरणात राणा यांना अटक होणार होती मात्र न्यायालयाने राणा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. यानंतर आयुक्त…
Lalbaghcha Raja

Lalbaghcha Raja : लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

Posted by - September 18, 2023 0
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळावर (Lalbaghcha Raja) कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंडळाविरोधात काळाचौकी…

बिग ब्रेकिंग ! मंत्री नवाब मलिक यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

Posted by - April 2, 2022 0
मुंबई- मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटकेत असलेले महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून सोमवारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *