Pankaja Munde

Pankaja Munde : मी बुद्धाचा नाहीतर कृष्णाचा मार्ग अवलंबलाय; पंकजा मुंडेंचे वक्तव्य

511 0

बीड : पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची शिवशक्ती यात्रा बीड जिल्ह्यामध्ये पोहोचली आहे. बीडच्या पाटोदा या ठिकाणी मुंडे यांच्या यात्रेचं आगमन झालं आहे. त्यांच्या या यात्रेला ठिकठिकाणी प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पाटोद्यामध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात पंकजा मुंडे यांचे स्वागत केलं. त्यांच्या स्वागतासाठी फुलाची उधळण देखील करण्यात आली. यावेळी पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मी आता बुद्धाचा मार्ग नाही तर श्रीकृष्णाचा मार्ग अवलंबल्याचे वक्तव्य केले.

नेमक्या काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
चार वर्षाच्या काळात मी फक्त राजकीय दुःखच नाही तर खूप काही सहन केलं आहे. पण माझी नीतिमत्ता एवढी लेचीपेची नाही. सर्व काही सहन करत असताना मी माझं धैर्य ढळू दिलं नाही, मी सत्य आणि तत्वाचं राजकारण करत असल्याचं मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं. सध्या महाराष्ट्रात माझ्याकडे कुठलीच जबाबदारी नाही, पण आता मी रखरखत्यां रनात उतरल्याचे मुंडे म्हणाल्या. मी आता बुद्धाच्या मार्गावर नाही तर आता मी श्रीकृष्णाचा मार्ग अवलंबला आहे. आता फक्त कर्म करायचे आहे. त्यामुळं मला फळाची कुठलीही अपेक्षा नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या. यापुढं जे काही करायचं ते जनतेसाठी करायचं. कारण जनताच माझं कर्म आणि माझा धर्म असल्याचे मुंडे म्हणाल्या.

मुंडे साहेबांच्या नावाशिवाय आता माझी क्षमता मला सिद्ध करायचीय
मुंडेसाहेब आता आपल्यामध्ये नाहीत. त्यामुळं कदाचित त्यांनी जर मला विचारलं की माझ्याशिवाय तू काय केलंस, त्यामुळे आता मुंडे साहेबांच्या नावाशिवाय मला माझी क्षमता सिद्ध करुन दाखवायची असल्याचे मुंडे म्हणाल्या. मला माझं कर्तृत्व सिद्ध करून काहीही मिळवायचे नाही हे सगळं जनतेसाठी करत आहे. मी निवडणुकीत एकदा हरले तर त्याचा काही लोकांनी खूप मोठा इशू केला. निवडणुकीमध्ये हार आणि जीत होत असते. मुंडे साहेब देखील एकदा पराभूत झाले होते. माझा पराभव कसा झाला हे आता सर्वांनाच कळलं आहे असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.

Share This News

Related Post

लोकपाल विधेयक संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून तपासावे, त्यासाठी कालमर्यादा निश्चित व्हावी : ना. डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by - March 25, 2023 0
मुंबई : विधान मंडळाच्या सभागृहात आलेले लोकपाल विधेयक संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून तपासावे. त्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात यावी, अशी सूचना…
Aged Women

पोटच्या मुलांकडून जन्मदात्यांचा सर्वाधिक छळ; धक्कादायक अहवाल आला समोर

Posted by - June 15, 2023 0
नागपूर : स्त्रीला कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ मानले जाते. मात्र आजच्या घडीला वृद्ध महिलांची अवस्था चिंताजनक आहे. म्हाताऱ्या आजींच्या छळामध्ये तब्बल…

नेमका कसा झाला विनायक मेटेंचा अपघात; पोलीस अहवाल TOP NEWS मराठीच्या हाती

Posted by - August 14, 2022 0
मुंबई: शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचं  अपघाती निधन झाले. मेटे यांच्या गाडीला आज रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यात…

मोठी बातमी ! अरविंद केजरीवाल यांना गुजरात उच्च न्यायालयाचा दणका ! या प्रकरणात ठोठावला 25 हजारांचा दंड

Posted by - March 31, 2023 0
गुजरात उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीची मागणी करणाऱ्या याचिकेवर निकाल दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान…

काँग्रेस माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली; सर गंगाराम रुग्णालयात उपचारार्थ दाखल

Posted by - March 3, 2023 0
नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. जानेवारी महिन्यातच त्यांना व्हायरल इन्फेक्शनमुळे आठ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *