Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत कोणी – कोणी दिले आपल्या पदाचे राजीनामे

430 0

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. एकीकडे हे आंदोलन शांतपणे चालले असताना दुसरीकडे मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेल्याचे पाहायला मिळत आहे. या मराठा आंदोलनाचा आता मंत्र्यांनी धसका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत काही आमदार आणि खासदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये 3 आमदार आणि 2 खासदार यांचा समावेश आहे.

आतापर्यंत कोणी-कोणी दिले राजीनामे
हिंगोलीचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील
नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे
वैजापूरचे शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे
परभणीचे काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर
गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार

या आंदोलनाने बीड, पंढरपूर आणि धाराशिवमध्ये हिंसक वळण घेतले आहे. बीड आणि धाराशिवमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच इंटरनेट सेवादेखील बंद ठेवण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

Amravati News

Amravati News : अमरावतीमध्ये भीषण अपघात; ट्रॅक्टर पलटी होऊन 20 मजूर जखमी

Posted by - December 12, 2023 0
अमरावती : अमरावतीमधून (Amravati News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये शेतमजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी झाल्याने 20 मजूर…
Ratnagiri News

Ratnagiri News : कुटुंब हळहळलं ! खेळत असताना अंगावर गरम पाणी पडल्याने चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - November 14, 2023 0
रत्नागिरी : लहान मुले बाहेर खेळताना (Ratnagiri News) किंवा घरातही खेळताना त्यांच्यावर अत्यंत काळजीपूर्वक लक्ष ठेवणे गरजेचे असते. अन्यथा तुमचे…

Eknath Shinde : ‘मी बाप आणि नवरा म्हणून अपयशी’ मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत दिली कबुली

Posted by - February 17, 2024 0
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं महाअधिवेशन भरवण्यात आलं आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार भाषण केलं. याच…

“भारताच्या सामर्थ्यामुळे हताश पाकिस्तानचे मोदीजींविषयी वक्तव्य…!” प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

Posted by - December 17, 2022 0
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सामर्थ्यशाली झाला आहे. पाकिस्तान भारतात दहशतवादी कारवाया करू शकत नाही तसेच भारताकडे…

भाजप उमेदवार अश्विनी जगताप पेड न्यूजमुळे संकटात; निवडणूक आयोगाने धाडली नोटीस, पुढे काय होणार ?

Posted by - February 21, 2023 0
चिंचवड : चिंचवड मतदार संघाच्या पोटनिवडणूक भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना पेड न्यूज प्रकरणी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. याप्रकरणी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *