Ahmednagar News

Ahmednagar News : 32 वर्ष निवडणूक लढला पण प्रत्येकवेळी पडला तरी जिद्द नाही हरला अखेर 51 व्या वर्षी सरपंच बनला

2277 0

अहमदनगर : सध्या राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडत आहेत. अनेक ठिकाणी अटी तटीची लढत पाहायला मिळत आहे. या सगळ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालांमध्ये एक निकालाने मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. हा निकाल आहे अहमदनगर जिल्ह्यातील अरणगाव ग्रामपंचायतीचा. ही संघर्षमय कहाणी आहे सरपंच पोपट पुंड यांची.

सरपंच पोपट पुंड यांचा संघर्ष
वयाच्या विसाव्या वर्षांपासून निवडणूक लढवली मात्र नेहमीच पराभवाला सामोरे जावे लागले. तब्बल 32 वर्षांनंतर वयाच्या 51 व्या वर्षी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळत पोपट पुंड यांनी थेट सरपंचपदाला गवसणी घातलीये. त्यांच्या विजयानंतर अख्ख्या गावाने जोरदार घोषणाबाजी, गुलालाची मुक्त उधळण केली. कार्यकर्त्यांनी पुंड यांना खांद्यावर नाचवत आनंद साजरा केला. नगरपासून अवघ्या पाच-सात किलोमीटरवर अरणगाव आहे. इथल्या ग्रामपंचायतीत माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या समर्थकांची सत्ता गेली अनेक वर्षे होती. या प्रस्थापित सत्तेला शह देण्याचे काम पोपट पुंड मागची अनेक वर्षे करत होते.

सरपंच पोपट पुंड यांचा प्रवास
पुंड यांनी वयाच्या 20 व्या वर्षी गावचे सरपंच व्हायचे म्हणून स्वप्न पाहिले.
मधल्या काळात त्यांनी 2002 ला पंचायत समिती
तर 2014 ला सरपंच होण्यासाठी निवडणूक लढवली
पण त्यांना थोड्याफार मतांनी 32 वर्षे पराभवाला सामोरे जावं लागलं
मात्र वयाच्या 51 वर्षी त्यांचं निवडणुकीतील अपयशाचं ग्रहण सुटलं आणि ते सरपंच झाले
सातत्याने पराभव पाहावा लागत असला तरी त्यांनी जिद्द सोडली नव्हती.
गावामधील लोकसेवेची कामे त्यांची सुरू होती. जनसंपर्क चांगला होता.
सत्तेत नसले तरी गावच्या विकासासाठीच्या शासनाच्या योजना गावात कशा येतील, यासाठी त्यांचे प्रयत्न आणि पाठपुरावा सुरू होता.

नगर तालुक्यातील अरणगाव ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांचं वर्चस्व आहे. त्यात पोपट पुंड यांनी 12 सदस्यांसह सरपंचपदावर बाजी मारल्यामुळे माजी मंत्री शिवाजी कर्डिले आणि भाजप खासदार सुजय विखे पाटील यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला. या निकालामुळे दोन्ही नेत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Share This News

Related Post

#GOA : कुठे रंग आणि गुलाल, कुठे फुले पण गोव्यातील या अग्नी होळी विषयी ऐकलंय का ? नक्की वाचा हि आश्चर्यकारक माहिती

Posted by - March 8, 2023 0
होळी हा रंगांचा सण असला तरी भारतातील वैविध्यपूर्ण देशात होळी ही अनेक प्रकारे साजरी केली जाते. कुठे रंग आणि गुलाल,…

Decision Cabinet Meeting : कृषी पंप ग्राहकांना दिलासा ; उपसा जलसिंचन योजनेमधील शेतकऱ्यांना 1 रुपया 16 पैसे प्रति युनिट वीज दरात सवलत

Posted by - July 27, 2022 0
मुंबई : राज्यातील कृषी पंप ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
A. R. Antulay

Nargis Antulay : राज्याचे माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचे निधन

Posted by - March 21, 2024 0
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा दिवंगत नेते बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले (Nargis Antulay) यांच्या पत्नीचे…
Chandrakant Khaire

Rahul Narwekar : ज्यांच्या फोटोला लोकांनी चपला मारल्या, त्यांना कोण निवडून देणार; खैरेंचा नार्वेकरांना टोला

Posted by - February 25, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबई दक्षिण मतदारसंघातून भाजप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) उतरवणार असल्याची चर्चा राजकीय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *